अहमदनगर

..अन्यथा शिक्षक भारतीच्या वतीने आंदोलन! शिक्षक नेते गाडगे

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत जाहीर करण्यात आलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्यावर हरकत घेण्यासाठी 3 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र हा कालावधी कमी असल्याने हरकती नोंदविण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्यसचिव सुनील गाडगे यांनी दिली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा तयार केलेला असून तो संकेतस्थळावर जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आलेला आहे.

मात्र यावर 3 जून पर्यंतच अभिप्राय देता येणार आहेत. जवळपास साडेतीनशे पानांचा हा मसुदा आहे व समाजातील सर्व घटकांतून या मसुद्यावर अभिप्राय येणे अपेक्षित आहे तसे आवाहनही विभागामार्फत करण्यात आलेले आहे, परंतु अभिप्राय नोंदवण्यासाठी दिलेला कालावधी कमी असून तो कालावधी 30 जूनपर्यंत वाढवून मिळावा. या आराखड्यात पाच विभागांमध्ये शैक्षणिक धोरणाचा आराखडा मांडण्यात आला आहे. यामुळे इतक्या कमी कलावधीत अभिप्राय देणे शक्य नाही. यासाठी पुरेसा वेळ देण्याची गरज आहे.

त्यामुळे आणखी काही दिवस परिषदेने द्यावे, अन्यथा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक नेते सुनिल गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, मोहंमद समी शेख, रामराव काळे, महेश पाडेकर, संभाजी पवार, संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे आदींना दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT