नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम

नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क: नाशिकच्या विभागीय  महसूल आयुक्तपदी अखेर डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे आज (दि. 31) सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेडाम हे यापूर्वी राज्याचे कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना आता नाशिकचे विभागीय आयुक्त ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

गेडाम यांनी 2014 ते 2016 या कालावधीत नाशिक मनपा आयुक्तपदाचाही कार्यभार सांभाळलेला आहे. त्यामुळे नाशिक हे त्यांना चांगले परिचित आहे. शिवाय, त्यावेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे त्यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते. त्यामुळे त्यादृष्टीने आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली असावी अशीही चर्चा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news