अहमदनगर

Nilesh Lanke : आमदार ही पदवी नव्हे, तर जबाबदारी : आ. नीलेश लंके

अमृता चौगुले

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आमदार ही वेगळी पदवी नाही. कुटुंबातील अडचणी समजून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या भावनेतून मी काम करतो. दिव्यांग बांधवांना आधार देण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय, नीलेश लंके प्रतिष्ठाणचा दिव्यांग सेल, पारनेर नगरपंचायत व पारनेर ग्रामीण रूग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ग्रामीण रूग्णालयात दिव्यांग बांधवांची तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबीर घेण्यात आले.शिबिराचे उद्घाटन आमदार लंके यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार लंके म्हणाले, दिव्यांग बांधवांची परवड थांबविण्यासाठी पारनेर येथेच कॅम्प घेऊन दिव्यांगांची तपासणी करून त्यांना घरी पाठविले जाते.त्यांच्या प्रमाणपत्रांसाठी नीलेश लंके दिव्यांग कल्याणकारी प्रतिष्ठाणमार्फत पाठपुरावा करून ते दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याची काळजी घेतली जाते. गेल्या वर्षी 2 हजार 800 रुग्णांना या कॅम्पचा फायदा झाला. त्याचे श्रेय सुनील करंजुले व त्यांच्या टिमला जाते.

नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदाम पवार, सचिव राहुल झावरे, मोहन रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, युवक तालुकाध्यक्ष प्रसाद नवले, मिडिया जिल्हाध्यक्ष श्रीकांत चौरे, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश लाळगे, डॉ. विकास वाळुंज, डॉ.बाळासाहेब कावरे यावेळी उपस्थित होते.

तरुणांचा आयडॉल

आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या कामांची झलक कोरानात संपूर्ण जगाला दाखवून दिली. दिव्यांग बांधवांसाठी त्यांनी मोठे काम केले. त्यामुळेच तरुणांचा आयडॉल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे माजी आमदार सुदाम पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT