आ. राम शिंदे यांच्या प्रयत्नाला यश; मिरजगावला 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर | पुढारी

आ. राम शिंदे यांच्या प्रयत्नाला यश; मिरजगावला 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर

कर्जत/मिरजगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मिरजगाव येथे अद्ययाावत ट्रामा सेंटर होणार असून, यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या सेंटरसाठीच्या आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मिरजगाव येथे जिल्हा उपरुग्णालयासाठी नुकतीच निविदा सूचना निघाली. 50 रुग्ण खाटांचे हे रुग्णालय आहे. यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारने मंजूर केला आहे.

मिरजगाव परिसरासाठी आरोग्या्च्या दृष्टीने महत्वाचे ट्रामा केंद्र आहे. मिरजगाव जवळून राष्ट्रीय महामार्गा जातो. या महामार्गावर अनेकदा अपघात होतात. उपचाराअभावी दुर्दैवाने अपघातग्रस्तांचा मृत्यू होतो, पण आता अद्ययावत रुग्णालय शासनाने मंजूर केल्याने त्याठिकाणी आरोग्य सुविधा मिळतील. सरकारच्या निर्णयाबद्दल भाजपचे संपत बावडकर, शेखर खरमरे, डॉ. झरेकर, लहू वतारे, काशीश्वर बुद्धिवंत, सारंग घोडेस्वार, अभिजित जवांदे यांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा

अहमदनगर : रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी अ‍ॅक्शन प्लॅन; पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर

नाशिक : कुस्ती स्पर्धेचा सराव करताना जवानाचा मृत्यू, चांदवड तालुक्यात शोककळा

Shivshakti Parikrama : पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज जामखेडला

Back to top button