अहमदनगर

कोपरगावचे दीड कोटीचे वाचनालय धुळीत

अमृता चौगुले

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हा योजनेंतर्गत सुमारे दीड कोटी रुपये खर्चून ग्रंथालयाची चार मजली इमारत बांधली. रंगरंगोटी करुन सुंदर इमारत दिमाखात उभी आहे, मात्र पुस्तकांची वर्गवारीच केली नाही. पुस्तके ठेवायला मांडण्याच नसल्यामुळे पुस्तके चक्क पोत्यात बांधून कोपर्‍यात ठेवण्याची अजब शक्कल लढविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वाचनालयाची इमारत वाय- फाय सुविधांसह सुसज्ज असणार होती. 'रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिवाइस आयआयडी' प्रणाली दुसरे ग्रंथालय ठरणार होते, मात्र विद्यार्थ्यांसाठी येथे अभ्यासिका अद्याप सुरू करण्यात आली नाही. माजी आ. स्नेहलता कोल्हे, बिपीनराव कोल्हे यांनी सतत शासन दरबारी पाठपुरावा करून पालिकेला निधी मिळवून दिला होता. कोरोनामुळे इमारत बांधकाम खोळंबले होते. 10 डिसेंबर 2021 रोजी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. कोपरगावच्या वैभवात त्यामुळे भर पडली. पालिकेच्या माध्यमातून वाचकांना अभ्यासाची सुविधा होणार होणार होती. या इमारतीमध्ये प्रशस्त पार्किंगसह पहिल्या मजल्यावर वाचनालय आहे.

कोपरगावकरांची एकेकाळची शान असलेले दिव्य सिंबोलिक डिजिटल घड्याळ, दुसर्‍या मजल्यावर ग्रंथालय, तिसर्‍या मजल्यावर वृद्ध व अपंगांसाठी प्रथमच लिफ्टच्या सुविधेसह विविध प्रकारची 16 हजार किंमती पुस्तके येथे उपलब्ध आहेत. इमारतीचे काम नाशिकचे ठेकेदार आर. के. सावंत यांना दिले होते. एकीकडे शासन साक्षरता अभियान राबवत आहे तर दुसरीकडे मात्र येथे मुख्याधिकार्‍यांसह सर्व अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. पुस्तकाची वर्गवारी केली नाही. त्याला फर्निचर व कपाटे नसल्याचे कारण दिले जाते.

वाचनालयाचे 350 सभासदांपैकी सुमारे दीडशे वाचक पुस्तके घेण्या- देण्यास येतात. वाचनाची वेळ दररोज सकाळी 9 ते 1 व सायं. 5 ते रा. 8 अशी ठेवली आहे. डेलिवेजेसवर ग्रंथपाल महेश थोरात काम करतात. प्रभारी ग्रंथपालाचा पदभार राजेंद्र शेलार यांच्याकडे आहे, परंतु ते वसुली विभागात काम करतात, अशी एकंदर परिस्थिती आहे.

विशेष असे की, 'रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिवाइस आयआयडी' प्रणाली अवलंब करणारी करणारे हे राज्यातील दुसरे ग्रंथालय ठरणार होते. माजी आ. स्नेहलता कोल्हे, 'संजीवनी'चे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी सतत शासन दरबारी पाठपुरावा करून पालिकेला निधी मिळवून दिला. फर्निचरसाठी ठेकेदार दोनदा येथे येऊन गेला.

माफीही घेतली, मात्र कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक. विद्यार्थी व शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची सोय होणार होती, मात्र अभ्यासिका अद्याप सुरू न केल्यामुळे बिकट अवस्था येथे पहायला मिळते. आर्किटेक रविकिरण डाके यांनी दिलेले इमारतीचे संकल्पचित्र वाचनालयाच्या चार मजली इमारतीमध्ये वाचकांसाठी मेजवाणी ठरणार होते. आजकाल सर्वजण मोबाईलच्या चक्रव्युव्हात अडकले त्यांना पुस्तके वाचण्यास कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

जुने पितळी घड्याळ कोठे आहे?

या नव्याने बांधलेल्या इमारतीवर सिम्बॉलिक पद्धतीचे डिजिटल घड्याळ बसवण्यात येणार होते, मात्र ते अद्यापपर्यंत दिसत नाही. पहिले जुने पितळी घड्याळ होते, त्याची काय विल्हेवाट लावली, हे सर्व गुलदस्त्यातच आहे.

येथील 16000 पुस्तकांची नीट निगा राखली जात नाही. तोच नव्याने 2 लाखांची पुस्तके घेण्याचा घाट पालिका घालत आहे. जे पुस्तक हवं आहे, ते वर्गवारी नसल्याने मिळत नाही. यामुळे आधी फर्निचरची सुविधा उपलब्ध करून द्यावी. सहाय्यक ग्रंथालय व शिपाई नसल्याने अडचणी येतात. वाचकांसाठी 20 बाय 20 चा हॉल कमी पडतो. तो प्रशस्त हवा.

– विजय जोशी, वाचक, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT