

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे आज १९ रोजी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. मोहित्याची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, मर्दानी, बाई मोठी भाग्याची अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. मर्दानी आणि आई पाहिजे, बाई मोठी भाग्याची हे चित्रपट विशेष म्हणावे लागतील.
त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकातून केली होती. 'देश बंधू संगीत मंडळीं'च्या नाटकातही त्यांनी अभिनय केला होता. अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने अशा प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केले होते.