अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी सावेडीतील हॉर्टबीट हॉस्पिटलमध्ये साहित्यांची तोडफोड केली व डॉक्टरांना मारहाण केली. या प्रकरणी डॉ. चंद्रकांत कदम (रा. एकवीरा चौक, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आप्पासाहेब बबन वाकचौरे, काकासाहेब बबन वाकचौरे (रा.रांजणगाव, ता.नेवासा) व इतर तीन अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेले रुग्ण बबन रामभाऊ वाकचौरे यांचा मृत्यू झाला. ही बाब डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाइकांना सांगताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत साहित्याची तोेडफोड तेली व डॉ. कदम, डॉ. अनिकेत गगे, डॉ. विशाल काळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अतिदक्षता विभागातील मॉनिटर, व्हेंटिलेटर, खुर्च्या, बेडची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक चांगदेव आंधळे करीत आहेत.
हेही वाचा