अहमदनगर

जामखेड : धनगर बांधवांचा खंबाटकी घाटामध्ये उद्या रास्तारोको

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृत्तसेवा :  यशवंत सेनेचे स्व.बी के कोकरे यांनी धनगर आरक्षणाची ज्योत पेटवलेल्या खंडाळा घाटात तिचे वणव्यामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला. बुधवारी (दि.20) खंबाटकी घाट (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे महाराष्ट्रातील धनगर बांधव रास्तारोको आंदोलन करणार आहेत. चौंडी येथील राज्यव्यापी आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बारा दिवसांपासून चौंडीत उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील धनगर बांधव एकवटला आहे. यासाठी आज रविवारी धनगर समाजातील सर्व आजी, माजी आमदार व सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांची राज्यव्यापी बैठक झाली. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली गेली. त्यानंतर माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांनी हा निर्णय जाहीर केला.

संबंधित बातम्या : 

दोडतले म्हणाले, ही लढाई फक्त यशवंत सेनेची नाही. आंदोलन धनगर समाजाच्या भावी पिढीसाठी आहे. ही लढाई समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक हितासाठी आहे. चौंडी येथील पवित्र ठिकाण असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी हे उपोषण सुरू आहे. हा देश घटनेवर चालत असेल तर 47 जातींना अदिवासींची सवलत मिळते मग धनगर समाजाला का नाही? असा सवाल त्यांनी केला.

आमचा एक उपोषण करणारा सिंह मरणाच्या दारात आहे. हा लढा आजच्या पुरता नाही. धनगर समाज्याच्या हाती काही तरी पडल्या शिवाय माघार घेणार नाही. दोन दिवस वाट बघू. जर आरक्षणाचा तिढा सुटला नाही, तर धनगर बांधव वनवा पेटविल्याशिवाय रहाणार नाही. समाज बांधवांनी आजचा संदेश प्रत्येक गावागावात घेऊन जावा आणि आंदोलनाचा लढा व्यापक करावा, असे आवाहन दोडतले यांनी केले. प्रदेशाध्यक्ष आण्णासाहेब दांगडे, माजी खा. विकास महात्मे आ. प्रा राम शिंदे, आ. दत्ता भरणे, माजी आ. रामहरी रूपनर, गणेश हाके, भाऊलाल तांबडे, नीतीन धायगुडे, निलम खैरनार, विद्या पोले, हनुमंत पावणे महाराज, किशोर मासाळ, अक्षय शिंदे यांच्यासह राज्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT