अकोले(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील राजूर, शाहुनगर, समशेरपुर, करंडी, गणोरे फाटा, सावरचोळ फाटा परिसरातील अवैध दारू थांबवणे हा प्राधान्यक्रम असून उपलब्ध कायदे, लोकसहभाग, नवीन कल्पना राबवून अवैध दारू पूर्णत: बंद केली जाईल. तसेचं दारूविक्री करणाऱ्यांकडून एक लाखाचा बाँड घेतला जाईल आणि दारू विकल्यास तो जमा केला जाईल. दारू विक्री होत असलेल्या बेकायदा इमारती ग्रामपंचायतीकडून पाडल्या जातील असे प्रतिपादन पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले.
तालुक्यात अवैध दारू विकणाऱ्यावर कडक कारवाई करुन अवैध दारु हद्दपार करण्यासाठी दारूबंदीचे प्रनेते हेरंब कुलकर्णी, संगमनेर उपविभागीय पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक विजय सुर्यवंशी, राजूर पोलिस स्टेशनचे स.पो. नि.गणेश इंगळे, अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, संदीप दराडे, संतोष मुतडक, मच्छिंद्र देशमुख,प्रमोद मंडलिक,डॉ.मनोज मोरे, संगीता साळवे, प्रदीप हासे,अरुण शेळके आदिच्या उपस्थितीत अकोले पोलीस स्टेशनमध्ये बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी दारूबंदी आंदोलनाचे समन्वयक हेरंब कुलकर्णी यांनी १५ ऑगस्टच्या शाहूनगर मध्ये केलेल्या आंदोलनानंतर तालुक्यात बंद झालेली अवैध दारू पुन्हा गावागावात वाढली आहे. संगमनेर, ठाणगाव, घारगाव मार्गे मोठ्या प्रमाणात गुन्हेगार दारू अकोले तालुक्यात आणत आहेत. परवानाधारक दारू दुकाने दारू गावोगावी देत आहेत. इंदोरी फाटा येथील गुन्हेगाराने दारू वाहताना ३ व्यक्तींना गाडीने उडवले पण गुन्हा सुध्दा दाखल झाला नाही. हे आरोपी तडीपार करावेत अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
गावागावांतील अवैद्य दारुमुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. महिलांना होणारे त्रास, हिंसाचार तसेच गांजाचा वापर वाढला असून जुगारात गरिबांची लूट होत आहे. तर अवैध दारु विक्री करणाऱ्या परिसरात पोलिस पाटील व बीट अंमलदार यांना जबाबदार धरत त्यांना नोटिसा देण्याची मागणी करण्याबरोबरचं चास गावच्या सरपंच आणि ग्रा.पं. सदस्यानी एकत्रित समस्या मांडल्या.
अकोले तालुक्यातील राजूर, शाहुनगर,समशेरपुर, करंडी,गणोरे फाटा,सावरचोळ फाटा परिसरातील अवैध दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री होताना दिसत आहे.तसेच वारंवार तक्रार करून देखील कुठलीही ठोस कारवाई होत नसताना दिसत नाही,अकोले पोलीस स्टेशनच्या हकेच्या अतंरावर असलेल्या शाहूनगर येथे चालू असलेली अवैध दारू प्रामुख्याने येत्या १५ दिवसाच्या आत बंद न झाल्यास राज्याला दिशादर्शक आंदोलन उभारले जाईल.
हेरंब कुलकर्णी, दारू बंदीचे प्रणेते.
हेही वाचा