अहमदनगर

आ. आव्हाडांची हकालपट्टी करावी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : राजकारणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या नावाचा वापर करणार्‍या आणि त्यांचा फोटो फाडणार्‍या स्टंटबाज आ. जितेंद्र आव्हाड यांची शरद पवार यांनी पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. आ. आव्हाड यांचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. मंत्री विखे पाटील म्हणाले की, भावनेच्या भरात आपण काय करतो याचे भान राहिले नसलेल्या आ. आव्हाड यांनी केलेले कृत्य अतिशय निंदनीय असून, आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना या घटनेन दुखावल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या काही स्टंटबाज नेत्यांनीच राज्याचे सामाजिक राजकीय वातावरण कलूषित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राजकारणात आता जनतेचे पाठबळ मिळत नसल्याने अशी कृत्ये करून प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास करताना आ.आव्हाड यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुध्दा पुरली नाही हे अतिशय खेदजनक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी या कृत्याचा निषेध म्हणून आ.आव्हाड यांची तातडीने पक्षातून हकालपटी केली पाहिजे, अशी मागणी करून, डॉ आंबेडकर यांच्या विचाराला आता कोणामुळे धोका आहे हे चेहरेसुद्धा आज या घटनेमुळे राज्याला समजल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT