सतरा वर्षाच्या मुलीवर सावत्र पित्याकडून लैगिंक अत्याचार; वांद्रे येथील घटना

सतरा वर्षाच्या मुलीवर सावत्र पित्याकडून लैगिंक अत्याचार; वांद्रे येथील घटना
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भादंविसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलगी ही तिच्या आईसोबत वांद्रे परिसरात राहते. आरोपी हा तिचा सावत्र पिता असून त्याला एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो जेलमध्ये होता, गेल्या वर्षी तो जेलमधून सुटून त्यांच्यासोबत राहण्यासाठी आला. रात्री उशिरा अनेकदा तो तिच्याशी अश्लील चाळे करत होता. तिच्यासोबत त्याने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून त्याने तिला धमकी दिली होती. त्यामुळे भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.

गेल्या काही दिवसांपासून तिला त्रास होऊ लागला, हा प्रकार तिच्या आईला लक्षात येताच तिने तिला जवळच्या डॉक्टराकडे नेले होते. त्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. चौकशीनंतर तिने तिचा सावत्र पिताच तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले.

त्यानंतर तिने वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानतर पोलिसांनी आरोपी पिताविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत आहे.

आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वांद्रे आणि खार पोलीस ठाण्यात चोरीच्या काही गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news