अहमदनगर

अहमदनगर : चैन स्नॅचिंग करणारे दोघे गजाआड

अमृता चौगुले

अहमदनगर : शहरात चैन स्नॅचिंग करणारे दोघेजण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून बारा तोळे सोने व 50 हजारांची दुचाकी असा आठ लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सलीम गुलाब शेख (वय 37, रा. राहुरी खु., हल्ली रा. वाळुज पंढरपूर, जि. छत्रपती संभाजीनगर), फिरोज शेख ऊर्फ लखन अजिज शेख (वय 30, रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी रफीक हबीब शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) हा पसार आहे.

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत 9 जून 2023 रोजी उषा अनिल सहस्रबुद्धे (रा. पाईपलाईन रोड) घरासमोर रांगोळी काढून जात असताना अनोळखी तिघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली, आरोपी सलिम शेख (रा. राहुरी) व त्याचा साथीदार सोने विक्रीसाठी जेऊर टोलनाका परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने तेथे फळविक्रेते व वाहनचालकाच्या वेशात सापळा लावला. दोन संशयित दुचाकीवरून तेथे आले.

त्यांना पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. विचारपूस केली असता सलीम गुलाब शेख, फिरोज शेख ऊर्फ लखन अजिज शेख अशी नावे सांगितली. त्यांची झडती घेतली असता 12 तोळे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आढळले. त्यांनी तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. ते सोने विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. पुढील तपासाकामी आरोपींना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होणार आञ्च्हेे, असे पोलिस अधीक्षक राकेश ओला म्हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT