अहमदनगर

जिल्ह्यातील सोळा कारखान्यांचे उच्चांकी गाळप, वाचा सविस्तर

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा

सहकाराची पंढरी म्हणून राज्यात अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. सहकारी साखर कारखानदारीचा पाया अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे घातला गेला. अहमदनगर जिल्ह्यात 13 सहकारी व 3 खाजगी कारखान्यांनी 14 मेपर्यंत 1 कोटी 46 लाख 61 हजार 384 मेट्रिक टन उसाचे गाळप करून त्यापासून 1 कोटी 44 लाख 77 हजार 187 पोती साखरेची निर्मिती केली आहे.

जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 10.6 टक्के आहे. नागवडे (श्रीगोंदा), तनपुरे (राहुरी), जगताप (श्रीगोंदा) हे तीन सहकारी, तर अंबालिका (कर्जत), क्रांती शुभर (पारनेर) या दोन खाजगी कारखान्यांचे धुराडे बंद झाले आहे. साखरेचा हंगाम जिल्ह्यात 5 जून पर्यंत चालेल असा अंदाज आहे. जिल्ह्यात अजूनही 10 लाख टन उस गाळपाअभावी तसाच शेतात उभा आहे. यंदा प्रचंड उन्हाच्या कडाक्यामुळे सर्वच कारखान्यांसमोर उसाचे गाळप कसे करायचे याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकर्‍यांचा ऊस उभा असल्याने उसतोडणी मजूर, हार्वेस्टर, मुकादम, शेतकी अधिकारी, व्यवस्थापन या सर्वांची चांदी झाली आहे. वर्षभर घाम गाळून शेतात राबणार्‍या शेतकर्‍याला त्याचाच ऊस तोडण्यासाठी पैशांसह कारखाना व्यवस्थापनाची मिन्नतवारी करावी लागत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शेतात जाऊन पाहणी केली. तर प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी प्रत्येक कारखाना कार्यक्षेत्रात कार्यस्थळावर जात किती उस गाळपासभावी शिल्लक आहे, याच्या बैठका घेतल्या.

पण त्यावर तोडगा काढू शकलेले नाही. अहमदनगर जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. स्वतःच्या शेताबरोबरच ते दुसर्‍याच्या शेतात मोलमजुरी करतात. उस तोडणीसाठी ते कुठून पैसे उभे करणार हा प्रश्न आहे. शेवटी त्यांना पाचटासह उस पेटून देण्याची पाळी आली आहे. सहकाराचे एकेकाळचे आधारस्तंभ शेतकर्‍यांच्या या परिस्थितीवर कसा तोडगा काढणार याची विवंचना सध्या भेडसावत आहे. जिल्ह्यात बहुसंख्य कारखान्यांनी साखरे ऐवजी इथेनॉल निर्मितीला या हंगामात प्राधान्य दिले आहे. त्यामुळे इथेनॉलमधून मिळालेला पैसा ज्या शेतकर्‍यांच्या ऊस शेतात गाळप अभावी उभा आहे.

त्यांना जिल्ह्याच्या सरासरी ऊस उत्पादनात दुप्पट भरपाई द्यावी, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांनी केले उसाचे गाळप साखर पोते तर दैनंदिन साखर उतारा टक्केवारीमध्ये पुढील प्रमाणे –

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी 886567, 787800 (10.00), कर्मवीर शंकरराव काळे कोसाका, कोळपेवाडी 765409, 838100, (11.75), भाऊसाहेब थोरात, संगमनेर 1446270, 1519070 (10.90), वृध्देश्वर 541930, 583900 (10.43), अगस्ती 607960, 681325 (12.16), मुळा 1435980, 1262700 (11.60), गंगामाई 1345100, 1293100 (10.40), ज्ञानेश्वर 1583215, 1616600 (10:33), पद्मश्री विठ्ठलराव विखे 1011664, 747100, गणेश 308550, 296325 (10.82), अंबालिका 1949760, 2095550 (10.76), क्रांती शुगर, पारनेर 143615, 154875 (10.80), कुकडी 798007, 803090 (10.07), नागवडे 894630, 955233 (10.64), तनपुरे 485677, 549925, (11.20), केदारेश्वर 379550, 292575 (10.83) याप्रमाणे गाळप झाले आहे.

राज्यात पाच मे पर्यंत 100 सहकारी 99 खाजगी कारखान्यांपैकी 88 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि नागपूर विभागात उच्चांकी 12 कोटी 79 लाख 14 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले.

हे ही वाचा: 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT