अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री निघणार्या कत्तल की रात्र मिरवणुकीसाठी व उद्या (शनिवारी) होणार्या मोहरम मिरवणुकीसाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 1100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. मिरवणूक मार्गावर चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रात्री बारा वाजता कत्तल रात्र मिरवणूक सुरू होणार होती.
मोहरला 20 जुलैपासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री कत्तल की रात्र मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मिरवणूक छोटे इमाम व बडे इमाम यांची सवारी कोठला येथे जाते. कत्तल की रात्र मिरवणुकीत पाच टेंभे असतील. शनिवारी सकाळी 12 वाजता पुन्हा छोटे इमाम व बडे इमाम यांची सवारी उठल्यानंतर मोहरम मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणूक पारंपरिक मार्गाने सावेडी गावापर्यंत जावून विसर्जित होणार आहे. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 105 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. टेहाळणी मनोरे उभारण्यात आले आहेत.
हेही वाचा