मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा 'हिंदुहृदयसम्राट' असे संबोधलेला फलक घाटकोपर तसेच चेंबूरमध्ये लावण्यात आला आहे. त्यांच्या हस्तेपक्षकार्यालयाचे उद्घाटनहोत आहे. त्यासाठी राज ठाकरे यांच्यास्वागताची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि भाजपमध्ये जवळीक झाल्याची चर्चा होती.
मात्र, मनसेशी सलगी केल्यासपरप्रांतीयविरोधात जातील आणि त्याचाफायदा काँग्रेस घेईल, अशी भीती भाजपलाआहे. परप्रांतीयांचा मुद्दा अडसर ठरत असल्याने मनसे आता हिंदुत्ववादी कार्डखेळण्याची शक्यता आहे. महापालिकानिवडणुकीत शिवसेनासुद्धा मराठी आणिहिंदुत्व कार्डवापरण्याची शक्यता आहे.म्हणून शिवसेनेला टक्कर देण्यासाठी मनसेहीहिंदुत्वाचे कार्ड वापरू शकते.
यावेळी मनसे महाविकासआघाडीसोबतअसणार नाही. त्यातच मुंबईत शिवसेना आणिभाजप यांच्यात काट्याची टक्कर असणारआहे. त्यात शिवसेनेलाशह देण्यासाठीमनसे हिंदुत्वाचा मुद्दा उचलण्याची शक्यतावर्तवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणूनघाटकोपर, चेंबूरमध्येलागलेल्या बॅनरवर राजयांचा हिंदुहृदयसम्राट म्हणून उल्लेख केला असल्याचे मानले जाते.
हे ही वाचलं का