नाशिक ; पुढारी ऑनलाईन नाशिकपासून जवळपास ९० किमी अंतरावर सुरगना तालुका आहे. या तालुक्यात दांडीची बारी नावाचे एक गाव आहे. ३०० लाेकसंख्या असणार्या या गावातील तरुणांसाठी सुखी वैवाहिक जीवन म्हणजे स्वप्नासारखे आहे. येथील एखाद्या तरुणाने लग्न करून नववधूला घरी आणले, तरी काही दिवसांतच ती मुलगी माहेरी कायमस्वरुपी निघून जाते. याचे कारण आहे पाणी. गावातील पाण्याच्या समस्यामुळे गावातील तरुणांसाठी सुखी संसार हे दिवास्वप्नच ठरत आहे.
नव्याने आलेल्या नववधूंपैकी बहुतेकांना तीव्र पाणीटंचाईने इतके त्रासलेले आहेत की त्यांना गावात राहण्याची इच्छा नाही. यातूनच त्या माहेरी निघुन जातात. गावकरी गोविंद वाघमारे यांनी एका लग्नाची गोष्ट सांगितली जे फक्त दोन दिवस टिकलं. ते म्हणाले, '2014 मध्ये एका मुलाचे लग्न झाले आणि दुसऱ्या दिवशी वधू तिच्या माहेरच्या घरी गेली. लग्नाच्या दुसर्या दिवशी, वधू पाणी आणण्यासाठी इतर स्त्रियांच्या मागे डोंगराच्या पायथ्याशी गेली; परंतु जेव्हा तिला हे समजले की हे काम किती कठीण आहे, तेव्हा ती कळशी तिथेच सोडून तिच्या माहेरच्या घरी निघुन गेली.
मार्च ते जून या काळात प्रत्येक उन्हाळ्यात टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कोरड्या ओढ्यातून पाणी आणण्यासाठी दीड किलोमीटर पायपीट करावी लागते. पाण्याच्या उगमापर्यंत जाईपर्यंत खडकाळ भागात चालत जाउनही संघर्ष संपत नाही. खडकाळ खळग्यात पाणी भरण्यासाठी त्यांना तासनतास पाण्यासाठी वाट पाहावी लागते. नंबर आल्यावर ती आत जाते, मग वाटीतून पाणी काढते आणि भांडे भरते. पोकळीतील सर्व पाणी आटले की, स्त्रिया ते भरण्याची वाट पाहतात. महिलांकडे प्रत्येकी दोन हंडे असतात, ते डोक्यावर घेऊन त्या गावी परततात.
पाणी आणण्याचे काम दिवसातून दोनदा केले जाते. पहिलं काम पहाटे ४ वाजता सुरू होते. ढळत्या सूर्यकिरणांच्या साथीने अंधारात महिला आपला प्रवास करतात. कडक ऊन आणि होरपळून काढणाऱ्या उष्णतेच्या आधी घरी परतण्यासाठी या महिला धडपडतात. येथील उन्हाळ्याचे तापमान साधारणपणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. आपला पाणी भरण्याचा नंबर येण्याची वाट पाहत असलेल्या लक्ष्मीबाई वासले म्हणतात, 'एक कळशी पाणी भरायला तीन तास लागतात आणि मग रात्रीच्या अंधारात गावाकडे चालत जावे लागते.
वन्य प्राण्यांपासून वाचण्यासाठी मशाल आणि टॉर्चचा वापर…
वन्य प्राण्यांपासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून स्त्रियासोबत मशाल घेऊन जातात. पाणी हाच इथला खजिना आहे. महिला घरातील, दैनंदिन कामांबद्दल आणि गावातील लोकांबद्दल आपापसात बोलतात. ती त्याच्याबद्दलही बोलतात जे गावातील तरुण जो लग्न करून आपल्या नवविवाहिते सोबत गाव सोडून जातात. कारण ते या अडचणींना तोंड देऊ शकत नाहीत.
नुसते गावाचे नाव ऐकून कोणी लग्नासाठी मुली देत नाहीत…
टँकर आल्यावर प्रत्येक घरात दोन बादल्या पाणी मिळते. अनेक सरकारी बाबू आमच्याकडे येतात, आमच्या वेदनांचे फोटो काढतात; पण आम्हाला कोणीही मदत करत नाही. आमचे गाव पिढ्यानपिढ्या दुष्काळी आहे. लग्नाच्या बाजारात गावाची बदनामी होते.2008-09 मध्ये तीन नववधूंना पाणी भरण्यचा एवढा धसका घेतला की त्यांनी काही दिवसातच गाव सोडले. पाणी समस्येमुळे या गावात मुली लग्नास नकार देत अआहेत. वराचे गाव दांडीची बारी असल्याचे समजताच वधू पित्याकडून लग्नाची चर्चा थांबवली जाते.
सरपंच जयराम वाघमारे
हे ही वाचलंत का ?