पणजी : लिंबू 50 रुपयांना आठ तर टोमॅटो 60 रु. किलो | पुढारी

पणजी : लिंबू 50 रुपयांना आठ तर टोमॅटो 60 रु. किलो

पणजी : पुढारी वृत्तसेवा

बेळगावसह कर्नाटकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटोची आवक घटल्याने त्याचे परिणाम गोव्यातील दरावर झालेले दिसून आले. रविवारी पणजी बाजारात टोमॅटोची विक्री 60 रुपये प्रति किलो दराने झाली, तर लिंबूचे दरही काही कमी होताना दिसत नाहीत. लहान आकारांच्या आठ लिंबूंची किंमत 50 रुपये होती.

याशिवाय बिन्सची किंमत 120 रु. प्रतिकिलो होती, तर मिरची 80 रुपये प्रतिकिलो होती. कांदे, बटाटे 30 रु. प्रतिकिलो विकले जात होते. हंगाम संपत आल्याने फ्लॉवरची किंमत 40 रु. प्रतिकिलो होती, तर कोबीची विक्री 30 रु. प्रतिकिलोने झाली.
मागील आठवड्याच्या तुलनेत इतर भाज्यांचे दर स्थिर होते. वांगी, भेंडी आणि शेवगा 50 रुपये प्रतिकिलो होते.

लिंबाने मात्र अनेकांना नाके मुरडायला लावली आहेत. उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढली आहे. वाढलेल्या मागणीचा परिणाम दरावर झालेला दिसतो. राज्यात बेळगाव, कोल्हापूर येथून आलेल्या लिंबाची विक्री आकारमानानुसार विक्रेते करीत आहेत. लहान आकाराच्या लिंबासाठी सात रुपये, तर मोठ्या आकाराच्या लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत होते. दरवाढीमुळे शेकड्याने लिंबू खरेदी करणारा ग्राहक कमी झाल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले.

भाज्यांचे दर प्रतिकिलो

  • कांदे 30 (रुपये
  • बटाटे 30
  • टोमॅटो 60
  • ढब्बू मिरची 80
  • कोबी 30
  • फ्लॉवर 40
  • भेंडी 50
  • बिन्स 120
  • मिरची 80
  • वांगी 50
  • शेवगा 50
  • लिंबू (लहान) 8 रुपये प्रतिनग
  • आले 80
  • लसूण 130

Back to top button