Maharashtra hospital deaths 
Latest

Maharashtra hospital deaths : अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणे ही बालिश कृती : जयंत पाटील

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव सुरु आहे. या परिस्थितीने राज्य हादरलं आहे. ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड नंतर आता नागरपूरमधुनही मृत्यूचा आकडा समोर येत आहे. आरोग्याच्या या दाहक स्थितीवर  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या 'X' खात्यावर' " सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी आहे. राज्यात ही परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते हा खरा सवाल आहे? " अशी पोस्ट करत सरकारवर जोरदार निशाणा साधला  आहे. (Maharashtra hospital deaths )
Maharashtra hospital deaths : सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते

खासदार हेमंत पाटील हे २४ रुग्णांच्या मृत्यूनंतर मंगळवारी (दि.३) रोजी दुपारी रुग्णालयात गेले होते. तेथे अधिष्ठातांच्या दालनात जाऊन त्यांनी अधिष्ठाता व अन्य डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. तसेच अधिष्ठाता व एका डॉक्टरला शौचालयाची सफाई करावयास लावली. या प्रकाराचे संमिश्र पडसाद उमटले. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या 'X' खात्यावर' पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

"या सरकारच्या काळात आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर पोहोचली आहे. प्रशासनातील गैरव्यवहार, औषधांचा अपुरा साठा, डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अशा अनेक बाजू पुढे आल्या आहेत. त्यावर गांभीर्याने काम करण्याची सरकारला गरज आहे. अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणे ही बालिश कृती करून गोष्टी सुरळीत होणार नाहीत. कारण इथे प्रश्न लोकांच्या जीवाचा आहे. दुर्दैवाने निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान असे ब्रिद वाक्य वापरणारे, या गंभीर परिस्थितीत ढिम्म बसले आहेत. सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी आहे. राज्यात ही परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते हा खरा सवाल आहे?"

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT