Latest

Uttar Pradesh Rain : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने १२ जणांचा मृत्यू, शाळांना दिली सुट्टी

अनुराधा कोरवी

लखनौ (उत्तर प्रदेश); पुढारी ऑनलाईन : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील पावसाने दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांना झोडपून काढले आहे. सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनेत उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh Rain ) येथील १२ जण आणि उत्तराखंडमधील एकाचा असे एकूण १३ जणांना मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणीच्या घरांची पडझड, झाडे कोसळणे आणि रस्ते उखडणे यासारख्या अनेक घटना घडल्या आहेत. तर याच दरम्यान उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आला आहे.

लखनौचे जिल्हाधिकारी सुर्यपाल गंगवार यांनी सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे एक आदेश जारी करत १२ वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यात त्यांनी मंगळवारी (११ ऑक्टोबर) रोजी शहरी, ग्रामीण भागातील सरकारी आणि खासगी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच जिल्हातील प्रत्येक शाळांना याबाबतचे आदेश देण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

याआधी लखनौशिवाय नोएडा, गाझियाबाद, आगरा, मेरठ, अलीगढ, मथुरा, कानपूर, एटा, मैनपुरी, फिरोजाबादमधील शाळांना सुट्टी देण्याचा आदेश दिला हहोता. हा आदेश १२ वी पर्यंतच्या सर्व शिक्षण मंडळाला लागू करण्यात आला होता. तर अलिगढमध्ये १२ ऑक्टोबर म्हणजे, उद्या बुधवारीदेखील शाळा बंद राहणार आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाने लखनौ, अलिगढ, मेरठ, गौतम बुद्धनगर आणि गाझियाबादमधील शाळा बंद केल्या आहेत. हवामान विभागाकडून यूपी-उत्तराखंडसह २० राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला होता. ( Uttar Pradesh Rain )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT