नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बनावट औषध बनवणाऱ्या १८ औषधनिर्मात्या कंपन्यांचा परवाना डीसीजीआय ने रद्द केले आहे. २० राज्यातील कंपन्यांचे डीसीजीआय कडून पाहणी करण्यात आली होती. बनावट औषधी बनवणाऱ्या कंपन्यांविरोधात सरकार ने कठोर पावले उचलली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, हिमाचल प्रदेश मधील ७०, मध्यप्रदेशातील ४५ आणि मध्य प्रदेश मधील २३ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेशामध्ये सर्वाधिक बनावट औषध बनवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबर २०२२ मधे हिमालय मेडिटेक प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला होता. तर १२ उत्पादकांचे उत्पादनाची परवानगी रद्द करण्यात आली होती. आता नव्याने बनावट औषध निर्मात्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याने औषध निर्माण क्षेत्रात चर्चांना पेव फुटले आहे.
हेही वाचा :