sindhutai and laxminarayan tripathi 
Latest

sindhutai : लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी जागवल्या सिंधुताईंच्या आठवणी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई….

या गाण्याच्या अर्थानुसारचं माई अर्थातचं सिंधुताई सपकाळ (sindhutai sapkal) यांनी या जगाला अलविदा म्हटलं. पोरक्यांना आपलंस करणाऱ्या अनाथांची माय सिंधुताई यांच्याविषयी मी हिजडा मी लक्ष्मी या पुस्तकाच्या लेखिका लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी त्यांच्या विषयी सोशल मीडियावर लिहिलं आहे. त्यांनी आपल्या नोटमध्ये काय म्हटलंय पाहूया. (sindhutai sapkal)

लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी दोन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका व्हिडिओत त्यांनी Goodbye, but you will always be in my memories and I will always treasure the memories that I created with you. A beautiful soul is never forgotten. #restinpeace #sindhutai #sindhutaisapkal #activist #rip अशी व्हिडिओ कॅप्शन लिहिली आहे. (अलविदा, परंतु तू नेहमी माझ्या आठवणींमध्ये राहशील आणि मी तुझ्याबरोबर तयार केलेल्या आठवणींचा खजिना माझ्‍याजवळ ठेवीन. एक सुंदर आत्मा कधीही विसरला जात नाही. #restinpeace #sindhutai #sindhutaisapkal #activist #rip)

'चिठ्ठी न कोई संदेश, जामे वो कौनसा देश जहाँ तूम चले गए ….जहाँ तूम चले गए' हे गाणे व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला वाजता दिसत आहे.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये –

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई….

हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत असताना दिसत आहे. दोन्ही व्हिडिओमध्ये दोघी बसलेल्या दिसत आहेत. सिंधुताईंच्या हातात पुस्तक दिसते. त्या लक्ष्मींना काहीतरी सांगत आहेत. आणि त्यावर दोघी हसताना दिसत आहेत.

साधी राहणी, नऊवारी साडी, पायात चप्पल, आणि डोक्यावर पदर असणाऱया माईंना लक्ष्मी त्रिपाठींनी अशा पध्दतीने श्रध्दांजली वाहिली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्रध्दांजली वाहिली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय-अनाथांची माय हरपली! अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त हे मनाला चटका लावणारं आहे. अनाथांचा मोठा आधारवड आज आपल्यातून गेला. सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!

पद्मश्री, अनाथांची माय, थोर समाजसेविका सिंधताई सपकाळ यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन. भावपूर्ण श्रद्धांजली ? #SindhutaiSapkal. नेटकऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT