Latest

साताऱ्यात राजे समर्थकांमध्ये राडा; नगरसेवकासह टोळीवर गुन्हे

backup backup

सातारा; पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यात राजे समर्थकांमध्ये राडा : साताऱ्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले खा. उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये जोरदार सशस्त्र राडा झाला.

साताऱ्यात राजे समर्थकांमध्ये राडा

या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या राड्यात ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या सर्व घटनेनंतर परिसरासह खासगी हॉस्पिटल बाहेर तणावाचे वातावरण आहे.

बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल किर्तीकर यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सनी मुरलीधर भोसले (सर्व रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संशयितांनी गुप्ती, रॉड, कोयता याचा हल्ल्यासाठी वापर केला. पिस्टलचा धाक दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व राडा राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात झाला.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT