Latest

सातारा : किल्‍ले सज्‍जनगडावरच्या ‘त्‍या’ बछड्याला मादी बिबट्याने नेले; घटना कॅमेऱ्यात कैद (Video)

निलेश पोतदार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यात किल्ले सज्जनगडावर काल (मंगळवार) भरदिवसा गडावरील रामघळ परिसरात काही युवक भटकंती करताना बिबट्याचा बछडा आढळून आला होता. या घटनेची माहिती वन खात्याला दिल्यानंतर वन अधिकारी निवृत्ती चव्हाण यांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर वनाधिकाऱ्यांनी या बिबट्याच्या बछड्याची पाहणी करून त्‍याला त्‍याच्या मादी बिबट्याकडेच पोहोचविण्याचे ठरवले. त्‍यासाठी त्‍यांनी बिबट्याच्या बछड्याला एका डालग्यात ठेवले. त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. रात्री उशिरा मादी बिबट्या आपल्‍या बछड्यावर आली. तिने या दीड महिन्याच्या आपल्‍या बछड्याला घेऊन इतर सुरक्षित ठिकाणी हलवले. या हालचालींची संपूर्ण घटना ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT