Latest

विराट कोहली : लॉर्ड्सवरील आक्रमकतेचा ‘विराट’ विजय

backup backup

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फालनल खेळलेल्या संघासाठी हा सर्वसाधारण विजय असायला हवा. मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने लॉर्ड्सवर मिळवलेला विजय खास आहे. या खास विजयाचीच चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात होत आहे.

लॉर्ड्सवर ज्यावेळी इंग्लंड पाचव्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी उतरला त्यावेळी त्याच्यासमोर २७२ धावांचे आव्हान होते. हे आव्हान पार करण्यासाठी त्यांच्या हातात दिवसाची जवळपास दोनच सत्रे होती. अशा परिस्थित क्रिकेट पंडित हा सामना ड्रॉच होणार असे गृहित धरुन चालले होते. मात्र विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या संघाने या क्रिकेट पंडितांचे पांडित्य सपशेल फोल ठरवले.

विराटच्या डाव घोषित करण्याने सर्वच अवाक

आधी विराटने भारताच्या दुसऱ्या डावात संघ 'सर्वबाद' होण्याची वाट पाहिली नाही. त्याने आठ बाद २९८ धावांवर आपला डाव घोषित केला. या रणनीतीवरुनच भारत या सामन्याकडे ड्रॉच्या दृष्टीकोणातून पाहतच नसल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर विराट कोहली ज्या पद्धतीने मैदानावर आक्रमकतेने वावरत होता. यावरुन टीम इंडियाला या सामन्यात विजयापेक्षा कमी काही नको होते हे प्रतिबिंबित झाले.

विराटच्या बॉडी लँग्वेजनुसारच त्याच्या गोलंदाजांनीही आक्रमक आणि अत्यंत तिखट मारा करत कसोटी ड्रॉ करण्याच्या मानसिकतेत असलेल्या इंग्लिंश खेळाडूंना कसोटी वाचवण्याच्या मानसिकतेत आणून ठेवले. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १२० धावांत गुंडाळले. त्यामुळे भारताने हा रोमांचक सामना १५१ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

विराट सेनेच्या आक्रमकतेने क्रिकेट पंढरी गाजली

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात भारतीय संघाचा आक्रमकपणा पाहायला मिळाला. भारताचे नेतृत्त्व करत असलेल्या विराट कोहली आक्रमक आहे हे सर्वांना माहिती आहे. पण या सामन्यात मोहम्मद सिराज ज्या प्रकारे भिडला, त्याने ज्या प्राकारे सामन्याच्या पाचव्या दिवशी अत्यंत तिखट मारा केला. ते पाहता मोहम्मद सिराजचा हा स्पेल इंग्लंडचा संघ नेहमी लक्षात ठेवेल हे निश्चित.

अँडरसनवर भडकला विराट कोहली

भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुल ५ तर रोहित शर्मा २१ धावांवर बाद झाले. रोहित बाद झाल्यानंतर विराट मैदानावर आला. विराट मैदानावर आल्यानंतर इंग्लंडचा अव्वल जलद गोलंदाज अॅडरसनवर भडकला. तो गोलंदाजी करत असताना पिचवरून जात होता. तेव्हा विराटने त्याला सुनावले. विराट म्हणाला, हे पिच आहे ना आणि तु त्यावरून पळतोयस. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

अँडरसन त्याच्या स्पाईकने खेळपट्टी खराब करत होता. त्यामुळे त्याचा फायदा भारताचा दुसरा डाव लवकरात लवकर गुंडाळण्यासाठी इंग्लिश गोलंदाजाना झाला असता. यामुळेच विराट आणि अँडरसनमध्ये वाद झाला. पण, अँडरसनची ही ट्रीक इंग्लंडच्या कामी आली नाही. त्यांना दुसऱ्या डावात भारताचा संपूर्ण संघ बाद करता आला नाही.

बुमराह बटलरची जोरदार बाचाबाची

पण, या घटनेनंतर दोन्ही खेळाडूंमधील तणावाचे क्षण वाढत गेले. जोस बटलर आणि जसप्रीत बुमराह यांच्यातही जोरदार वाद झाले. त्याचा परिणाम उलटा झाला आणि संपूर्ण भारतीय संघ चार्जअप झाला. याच संघाने पुढे पाचव्या दिवशी दोनच सत्रात इंग्लंडच्या संघाचा १२० धावात खुर्दा उडवला.

बुमराह – बटरल वाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये बसलेला विराट कोहलीही प्रचंड संतापला होता. तो हातवारे करत बटलरच्या कृत्यावर नाराजी व्यक्त करत होता.

मोहम्मद सिराज या सामन्यात भलत्याच फॉर्ममध्ये

यापूर्वी, मोहम्मद सिराजने गोलंदाजी करताना इंग्लंडच्या ओली रॉबिन्सनला डिवचलं होतं. त्यावेळी मैदानात थोडी बाचाबाची झाली.

रॉबिन्सन जेव्हा गोलंदाजी करत होता, त्यावेळी तो भारतीय फलंदाजांवर टिपण्या करत होता. मात्र रॉबिन्सन जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मोहम्मद सिराजने खुन्नस दिली होती सिराजचा एक चेंडू रॉबिन्सनच्या छाताडावर आदळला त्यावेळी सिराजने त्याला खुन्नस दिली होती.

मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात ४ विकेट घेत आग ओकणारा स्पेल टाकला. त्याने पहिल्या डावातही ४ विकेट घेत चांगला मारा केला होता.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : अफगाणिस्तानात हाहाकार! उडत्या विमानातून तिघे कोसळले

https://youtu.be/0C9F33TFAhc

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT