Latest

लोकल प्रवास : केवळ मासिक पास मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर संभ्रम

backup backup

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी नुकतेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास मुभा देण्यात येईल असे सांगितले होते. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र या आनंदावर विरझण पडणार असून लोकल प्रवासाची मुभा केवळ मासिक पास धारकांना मिळणार आहे.

मात्र ज्या प्रवाशांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत, त्यांना काही कामानिमित्त लोकलने प्रवास करण्याची वेळ आली तर त्याला तिकीट दिले जाणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या २५ मार्च २०२० रोजी मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल बंद झाली. त्यानंतर उपनगरीय प्रवास करणे अंत्यंत गैरसोयीचे झाले होते. यामुळे अनेक खाजगी कार्यालयात काम करणाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर काहींना घरातून काम करण्यास सांगून अर्धा पगार देण्यात आला.

गजबजलेले डोंबिवली स्थान सुने

त्यामुळे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला देखील मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागला. मध्य रेल्वेतील सर्वात जास्त गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली स्थानकात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते. लोकल प्रवास पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयाची प्रवसी आतुरतेने वाट पाहत होते. तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी घेतल्याने प्रवासी वर्ग खुश झाला.

मात्र ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनाच केवळ मुभा दिल्याचे सांगत क्यूआर कोड देऊन पास दिला जाईल असे सूतोवाच केले. मात्र यात सर्वात मोठा संभ्रम निर्माण आला असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या निर्णयात कुठेही मासिक पास व तिकीट याबाबत उल्लेख केला नाही. मात्र बृहन्मुंबई पालिकेच्या ठरावात मासिक पास दिला जाणार असून तिकीट मिळणार नाही असे स्पष्ट लिहीले आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना पासाची मुभा, पण तिकीट नाही असा निर्णय झाल्याचे स्पष्ट होते.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न

डोंबिवली स्थानकाबाहेर पालिकेच्या वतीने ११ स्टॉल लावले जाणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांनी आपले दोन्ही डोस घेतलेले सर्टफिकिट व आपले ओळखपत्र दाखवल्यास परवानगी देण्यात येईल. त्यानंतरच त्यांना लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट घरातून पास मिळेल. मात्र प्रवाशांची गर्दी होणार असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येईल.

मंगळवारी सायंकाळी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, रेल्वे सुरक्षा बलाचे हरफुल सिंह राठोड, डोंबिवली रेल्वे पोलीस यांनी रेल्वे स्थानकाबाहेर परिसराची पाहणी करून स्टॉल आणि बंदोबस्त कसा ठेवता येईल चर्चा केली.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : डिंपलको सिंपल नही समझनेका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT