Latest

रशियन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने घेतली डोभाल यांची भेट

नंदू लटके

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अफगाणिस्तानवरील तालिबानच्या कब्जानंतर अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांच्‍या पाठोपाठ रशियन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोले पेत्रुशेव यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली आहे. रशियन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने डोभाल यांची भेट घेत उभय देशांनी अफगाणिस्‍तान प्रश्‍नी परस्‍पर सहकार्यावर भर देण्‍यावर चर्चा केली.

परस्पर सहकार्य करण्यावर भर

तालिबानमुळे कब्जामुळे आशिया खंडातील विविध देशांत तसेच युरोपमध्ये अफगाणी निर्वासितांचे लोंढे घुसण्याचीही शक्यता आहे. अफगाणिस्तानच्या संदर्भात जास्तीत जास्त परस्पर सहकार्य करण्यावर दोन्ही बैठकांमध्ये जोर देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विल्यम बर्न्स यांच्या भेटीला काही तासही होत नाही तोच रशियन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोेले पित्रुशेव यांनी डोभाल यांची भेट घेतली. अमेरिकेला हव्या असलेल्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यालाच तालिबानने पंतप्रधान म्हणून नेमल्याने अमेरिकेची चिंता वाढली आहे.

पाकिस्तान तालिबानच्या मदतीने भारतात अस्थिरता पसरविण्याच्या प्रयत्नात

भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर होता कामा नये, अशी भारताची भूमिका आहे. तर पाकिस्तान तालिबानच्या मदतीने भारतात अस्थिरता पसरविण्याच्या प्रयत्नात आहे.

विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये चीन आणि पाककडून आगामी काळात आगळीक होऊ शकते.

तालिबानने कब्जा केल्यापासून आतापर्यंत दहशतवादी हल्ले होण्याचे दहापेक्षा जास्त अ‍ॅलर्ट गुप्तचर संस्थांनी दिलेले आहेत.

अफगाणिस्तानच्या संदर्भात भारताने जास्तीत जास्त गुप्त माहिती पुरवावी तसेच काही अफगाण्यांना शरण द्यावे, असा आग्रह विल्यम बर्न्स यांनी डोभाल यांच्याकडे केल्याचे समजते.

अफगाण मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 24 ऑगस्ट रोजी रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर रशियन राष्ट्रीय सल्लागार निकोले पित्रुशेव यांनी बुधवारी डोभाल यांची भेट घेतली.

हेही वाचलं का ? 

व्‍हिडिओ 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT