Latest

रमेश लटके; जिवाला जीव देणारा कार्यकर्ता आम्ही गमावला : मुख्यमंत्री

निलेश पोतदार

मुंबई; पुढारी वृत्‍तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवाचे अंधेरी पूर्वेतील कामगार कल्याण भवन येथे अंत्यदर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, रमेश हा जिवाला जीव देणारा कार्यकर्ता आम्ही गमावला आहे. शिवसेनेचे न भरून येणारे हे नुकसान आहे. मला वाटत नाही की त्यांनी कुणाला नाही म्हटले आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार गजानन कीर्तिकर, संजय राऊत, सुनील राऊत, अनिल परब, रवींद्र वायकर, नीलम गोरे, एकनाथ शिंदे, भाजपाचे आशिष शेलार, मुरजी पटेल यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. पार्थिवाची अंत्ययात्रा कामगार कल्याण भवन येथुन मार्गस्थ झाली. गुंदवली मोगाविरा बँक, आमदार रमेश लटके जनसंपर्क कार्यालय, वर्मानगर, जुना नागरदास रोड, शिवसेना शाखा, पारसी पंचायत रोड, पंपहाऊस सबवे, आघाडी नगर, शेर- ए-पंजाब, गुरुद्वारा सर्कल, शांती नगर, हॉली फॅमिली स्कूल, चकाला वजन काटा, सिगरेट फॅक्टरी मार्गे पारशी वाडा स्मशानभूमीकडे मार्गस्थ होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT