धोनी करणार तमिळी चित्रपटाची निर्मिती | पुढारी

धोनी करणार तमिळी चित्रपटाची निर्मिती

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताला एकदिवसीय सामन्यांचा आणि टी-ट्वेन्टी सामन्यांचा विश्‍वचषक मिळवून देणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता नव्या मैदानात नशीब आजमावून पाहणार आहे. तो आता तमिळ चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी धोनीने मेगास्टार रजनीकांत यांची जवळची व्यक्‍ती असलेल्या संजयची निवड केली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. धोनी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असून या सिझननंतर तो चित्रपटाबाबत अधिकृत माहिती देऊ शकतो. या चित्रपटाचे शूटिंग याच महिन्यात सुरू होणार आहे. चेन्‍नईला चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा धोनी ‘चेन्‍नई सुपर किंग्ज’मुळे तामिळनाडूत प्रचंड लोकप्रिय आहे.

Back to top button