बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजिवनी करंदीकर यांचे निधन | पुढारी

बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजिवनी करंदीकर यांचे निधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे : ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी संजीवनी करंदीकर (वय 84) यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले.

अंबाजोगाई : रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, संशयीत आरोपी फरार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या आत्या होत्या. त्यांच्या पश्चात कन्या कीर्ती फाटक, स्वाती सोमण असा परिवार आहे. प्रबोधनकार ठाकरे यांना एकूण आठ अपत्ये होती. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाचवा क्रमांक, तर संजीवनी यांचा सातवा क्रमांक होता. या आठ अपत्यांपैकी संजीवनी एकट्याच सध्या हयात होत्या. त्यांची प्रकृती खालावल्याने गुरुवारी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

हिंगोली : पाणी पिताना पूर्णा नदीत बुडून सख्ख्या बहिणभावाचा करुण अंत

करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे पुण्यात गेली. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात नोकरीला सुरुवात केली. 38 वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Back to top button