Latest

मुंब्रा-पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी बंद; पोलिसांनी केले ट्टिवट

नंदू लटके

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा: मुंब्रा-पनवेल महामार्ग मुसळधार पावसामुळे वाहतुकीसाठी बंद करण्‍यात आला आहे. मुंब्रा-पनवेल महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्‍यात आल्‍याची माहिती पोलिसांनी एक व्हिडिओसह ट्टिवट केली आहे.

अधिक वाचा

कळवा, दिधा,मुंब्रा, कोसा, शिळफाटा, डोंबिवली, बदलापूर आदी ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

ठाणे वाहतूक पोलीसांनी या परिस्थितीचा आढावा घेत एक व्हिडिओ ट्टिट करत मुंब्रा पनवेल महामार्गाची वाहतूक पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्‍यात आला.

अधिक वाचा 

मुंब्रा अमृतनगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. याच मार्गाने नाशिक महामार्गावरून नवी मुंबई, ठाणे, शिळफाटा मार्गाने प्रवासी येतात.

या मार्गावर रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी साचले आहे. शनिवारी ऐक कार शिळफाटा मार्गावर तरंगत होती. या भागात पुरपरिस्थीत सारखा पाण्याने विळखा घातला आहे.

अधिक वाचा 

यामुळे मुंब्रा मार्गाने नवी मुंबई, पनवेल,कंळबोली, जेएनपीटी, तळोजा एमआयडीसी, कंळबोली स्टील मार्केटकडे आणि पुणे, गोवा महामार्गाकडे जाणा-या सर्व वाहनांना बंदी केली आहे.

काही वाहनचालकांनी शिळफाटा मार्गाने नवी मुंबई म्हापे मार्गाने वाहने आणण्याचा प्रयत्न केला. त्यातील म्हापे एमआयडीसी तील नाल्याजवळून जाणारी एक कार नाल्यात वाहून जाण्याची घटना सकाळी साडे दहा वाजता घडली.लोकांनी प्रसंगावधान राखून कार मधील चोघांना बाहेर काढण्यात यश आले.

एमआयडीसी भागात डोंगर माथ्यावरून वाहून येणारे पाण्याने सर्व नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे कुणी ही या मार्गाने प्रवास करून नये. आवश्यक असेल तरच बाहेर निघा अन्यथा घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!

SCROLL FOR NEXT