Latest

‘मी भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलतोय’ म्हणणाऱ्याला ठोकल्या बेड्या

backup backup

'भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून मी बोलतोय. तुमचा जो काय वाद झालेला आहे याबाबत साहेबांचे एसपी तसेच पोलीस कमिशनर यांच्याशी बोलणे झाले आहे. तुम्ही मला समक्ष येऊन भेटा यावर आपण तोडगा काढू.' असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांची बदनामी करणाऱ्या, तसेच कासुर्डे यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अंबड पोलिसांनी सांगितले की, बुधवारी दिनांक १८ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी महेंद्र पाटील याने कासुर्डे यांना मोबाइलवर फोन केला.

आरोपीने 'मी भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलत आहे. तुमचे केस मध्ये तुम्हाला मदत करू. माझे भुजबळ साहेबांची बोलणे झालेले आहे . तसेच माझे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याशी देखील बोलणे झाले आहे.परंतु तुम्ही समक्ष या नाही तर तुमचा माणूस मला भेटायला पाठवा. खाली हात पाठवू नका. काय असेल ते करून घेऊ.' असे कासुर्डे यांना सांगितले.

दरम्यान, पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव घेऊन खोटा फोन करणाऱ्या संशयित महेंद्र पाटील यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेची पोलिसांनी माहिती घेतली असता, संशयित महेंद्र पाटील याने फोन केला त्या कासुर्डे यांच्या पत्नीच्या नावे निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी महेंद्र पाटील याने भुजबळ यांच्या बंगल्यावरुन बोलतो आहे असा खोटा फोन केला होता.

दरम्यान, पालकमंत्री भुजबळांच्या कार्यालयातील अधिकारी महेंद्र पवार यांच्या तक्रारी वरून संशयित महेंद्र पाटील याच्या विरोधात बदनामी व फसवणुकीचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश शिंदे अधिक तपास करीत आहे.

हेही वाचले का?

SCROLL FOR NEXT