Latest

पॉर्न फिल्म रॅकेट : ‘राज कुंद्राने माझे फूल न्यूड व्हिडिओज केले, शिल्पाला ते आवडायचे’

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्याकडे शुक्रवारी तब्बल आठ तास कसून चौकशी केली. पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणाच्या चौकशीत गुन्हे शाखेच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली असून शर्लिन चोप्रा हिला पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडे आपला जबाब नोंदवल्यानंतर शर्लिनने एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. त्यात तिने राज कुंद्राने म्हटले होते की शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडिओज खूप आवडायचे.

शर्लिनने पुढे म्हटले की, राज कुंद्रा माझा गुरु होता. पण त्याने माझी दिशाभूल केली. जे काही शूट करत आहे ते केवळ ग्लॅमरसाठी आहे, असे तो मला सांगायचा.

शर्लिन चोप्रा

सेमी न्यूड आणि पॉर्न आजच्या काळात कोणती मोठी गोष्ट नाही. ही सामान्य बाब आहे. प्रत्येकजण असे करतो. आणि मीदेखील असेच केले पाहिजे, असे मला वारंवार सांगितले जायचे.

'…आणि मी पॉर्न केसमध्ये अडकले'

मी कधी विचार केला नव्हता की मी पॉर्न केसमध्ये अडकेन. जेव्हा मी राज कुंद्राला भेटले तेव्हा मला असे वाटले की माझे आता जीवन बदलून जाईल. मला मोठा ब्रेक मिळेल. मी कधीही विचार केला नव्हता की शिल्पा शेट्टीचा नवरा माझ्याकडून काही चुकीचे काम करवून घेईल, असा खुलासा शर्लिनने केला आहे.

मी राज कुंद्राच्या आर्म्सप्राइम मीडिया सोबत एक करार केला आणि व्हिडिओज बनवणे सुरु केले. त्यानंतर हळूहळू बोल्ड चित्रपटांविषयी माहिती होत गेले. त्यानंतर मला सेमी न्यूड आणि फूल न्यूड व्हिडिओज करायला लावले. मला नेहमीच सांगितले जात होते की यात चुकीचे काहीच नाही. हे सगळेच करतात.

'शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओज आणि फोटोज आवडायचे…'

राज कुंद्रा मला सांगायचा की शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओज आणि फोटोज आवडतात. यामुळे मला आणखी व्हिडिओज करण्यासाठी प्रोत्साहन मिळायचे.

जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टी सारख्या व्यक्तीकडून प्रोत्साहन मिळते त्यावेळी तुम्हाला कळत नाही की काय खरे आणि काय खोटे? असेही शर्लिनने मुलाखतीत म्हटले आहे.

मालमत्ता कक्षाने फेब्रुवारी महिन्यात पॉर्न फिल्म निर्मिती आणि प्रसारणाचे रॅकेट उघडकीस आणून उद्योगपती राज कुंद्रा, अभिनेत्री गहना वशिष्ठ यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली आहे.

या गुन्ह्याच्या तपासात अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिचा सहभाग समोर येत असल्याने गुन्हे शाखेने तिला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले. मात्र अटकेच्या भीतीने शर्लिनने न्यायालयात धाव घेतली होती.

हे ही वाचा : 

पहा व्हिडिओ : मुंबईजवळ वसलेल्या सोंडाई गडाची सफर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT