Latest

पंजशीर वर तालिबानचा पंजा; मोदी, शहा, राजनाथ आणि डोभालांची बैठक

backup backup

अफगानिस्तानमधील तालिबानला कडवा प्रतिकार करणाार पंजशीर प्रांत तालिबानच्या ताब्यात गेल्याचे वृत्त आले. तालिबानने पूर्ण पंजशीरवर कब्जा मिळवल्याचा दावा केला. त्यानंतर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत चर्चा केली.

ही बैठक पंतप्रधानांचे लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवसस्थानावर झाली. तालिबानने कडवा प्रतिकार करणाऱ्या पंजशीरवर संपूर्ण ताबा मिळवल्याचा दावा केला होता. त्यानंतर विरोधी गटाने तालिबान विरुद्धची लढाई सुरुच राहील असे सांगितले आहे. या तालिबान विरोधी गटाचे नेतृत्व माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह आणि अफगान गोरिल्ला कमांडर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद करत आहेत.

दरम्यान, तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुदाहीद यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, 'पंजशीर प्रांतात मिळवल्या विजयाबरोबरच देशाला आम्ही युद्धाच्या दलदलीतून पूर्णपणे बाहेर काढले आहे.' याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तालिबानचे योद्धे पंजशीर प्रांताच्या गव्हर्नर कार्यालयाच्या गेटजवळ उभे असल्याचे दिसत आहे.

तालिबानच्या प्रवक्त्याने त्यानंतर केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 'इस्लामिक अमिरात ( तालिबान ) विद्रोहाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. कोणी जरी विद्रोह सुरु करण्याचा प्रयत्न केला तर त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. आम्ही कोणालाही विद्रोह करण्याची परवानगी देत नाही.'

अफगानिस्तानमधील अश्रफ गनी सरकार पडल्यानंतर आणि अमेरिकेचे सैन्य २० वर्षानंतर अफगानिस्तान सोडून गेल्यानंतर तालिबानने जल्लोष केला होता. त्यांनी लगेचच पंजशीर प्रांतातील कडवा प्रतिकार मोडून काढण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचले का?

SCROLL FOR NEXT