देवेंद्र फडणवीस: करूणा शर्मा प्रकरणात कोणत्याही दबावाविना चौकशी करा | पुढारी

देवेंद्र फडणवीस: करूणा शर्मा प्रकरणात कोणत्याही दबावाविना चौकशी करा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : करूणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिवळी ओढणी ओढलेली एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागपूर विमानतळावर सोमवारी (दि ०६) ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हिडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सत्तेचे लचके तोडण्यासाठी महाविकास आघाडी

महाविकास आघाडी ही गव्हर्नससाठी झाली नसून सत्तेचे लचके तोडण्यासाठी झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रत्येक जण हा सत्तेचे लचके तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे.

ते जमले नाही तर आपसातच लचके तोडण्याचे त्यांचे काम सुरू असल्याचाही टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ते म्हणाले की, एमव्हीए आघाडी उत्तम सरकार देण्यासाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी झाली आहे.

प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि ते जमले नाही झाले तर आपसात लचके तोडा असे त्यांचे सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

राजेंद्र शिंगणे यांनी यांनी आपलं सरकार असले तरी रस्त्यावर उतरुन आंदोलने करा, निदर्शनं करा, असा अजब सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यावरून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला सामोरे जावे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने लूक आऊट नोटीस काढली आहे.

खंडणी आरोप प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरूद्ध ईडीने लूकआऊट नोटीस बजावल्याचे मलाही माध्यमातूनच कळले.

देशमुख यांचा आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा प्रवास झाला आहे. त्यामुळे आता त्यांनी कायद्याच्या दृष्टीने ईडीच्या चौकशीला सामोरे जावे तेच योग्य होईल, असे सल्ला फडणवीस यांनी यावेळी अनिल देशमुख यांना दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी पहिले सोबतच्या पक्षांना शिकवावे

मुख्यमंत्री यांनी भाजपा आंदोलन करून राजकारण करत असल्याची टीका केली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर गणेशोत्सवात सतर्कता बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे, याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर बोलणार नाही.

मात्र मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर बोलण्या ऐवजी पहिल्यांदा सोबतच्या पक्षांना शिकवावे मग आम्हाला बोलावे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Back to top button