रवी शास्त्री यांच्या पाठोपाठ अजून दोघे कोरोना पॉझिटिव्ह - पुढारी

रवी शास्त्री यांच्या पाठोपाठ अजून दोघे कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी रवी शास्त्री आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ यात भारत अरुण, श्रीधर, नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

त्यानंतर या सर्वांची आरटी – पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये शास्त्रींबरोबरच भारत अरुण आणि आर. श्रीधरन यांचा अहवाल पॉझिटिव्ह आळा आहे. ते सर्व जण आधीपासूनच विलगीकरणात आहेत. आता त्यांच्या दोन कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्याशिवाय ते विलगीकरणातून बाहेर येऊ शकणार नाहीत. त्यामुळे ते १० सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यासाठीही मुकण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांचीही आरटी – पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह अल्याची खात्रीलायक बातमी आहे. सूत्र म्हणाला ‘दुर्दैवाने त्यांची आरटी – पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता त्यांना विलगीकरणात रहावे लागणार आहे. ज्यावेळी त्यांच्या दोन कोरोना चाचण्या निगेटिव्ह येतील त्याचवेळी ते विलगीकरणातून बाहेर येऊ शकतात.’

शनिवारी काय घडले?

रवी शास्त्री यांच्यासह त्यांचा सपोर्ट स्टाफला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी अर्धा तास आधी विलगीकरणात ठेवले. रवी शास्त्री यांची शनिवारी संध्याकाळी केलेली फ्लो टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर संघातील इतर सर्व सदस्यांची शनिवारीच अजून एक फ्लो टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी सकाळीही त्यांची फ्लो टेस्ट करण्यात आली. त्यानंतर ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे त्यांना सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणावर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक राठोड म्हणाले, ‘नक्कीच आम्ही रवी शास्त्री यांना मिस करणार. रवी भाई, भारत अरुण आणि आर. श्रीधरन हे संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. त्यांनी गेल्या पाच – सहा विर्षात संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. पण, आज ते आमच्याबरोबर नाहीत.’

ते पुढे म्हणाले की, ‘सकाळी या बातमीमुळे आमचे लक्ष विचलीत झाले. त्यांनी आम्ही बोललो आणि क्रिकेटवर फोकस करण्याचे ठरवले. आम्ही या मालिकेसाठी इथे आलो आहोत. मला वाटते की आमच्या खेळाडूंनी आपले लक्ष विचलीत न होऊ देता खेळावर लक्ष केंद्रित केले. ज्या प्रकारे खेळाडूंनी स्वतःला सावरले त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.’

राठोड यांनी पत्रकार परिषदेत त्या संध्याकाळचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले ‘रवी शास्त्री शनिवारी रात्री आठ वाजता आजारी पडले. त्यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे वैद्यकीय पथकाने त्यांची फ्लो टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. ती चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याचवेळी आम्हालाही कळाले होते की ते पॉझिटिव्ह आले आहेत. चाचणी करतेवेळीच त्यांच्या जवळून संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात ठेवले होते. आता ते पुन्हा आमच्याशी कधी जोडले जाणार याची वाट पाहत आहोत.’

हेही वाचले का? 

Back to top button