Latest

पंचगंगा नदी पुन्हा घामटा फोडणार? २०१९ ची पातळी गाठण्यास फक्त…..

backup backup

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर (kolhapur rain) जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी दिवसभर अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाने कोसळत आहे.

दरम्यान पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्‍यावर पाणी (दि.२३) १२ पर्यंत ५१.८ फुटांवर गेल्याने पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात २०१९ साली राजाराम बंधाऱ्यावर ५७.६ फुट इतकी पाणी पातळी गाठली होती. आताच्या पाणी पातळीत आणि २०१९ च्या पाणी पातळीत अवघ्या पाच फुटांचे अंतर राहिल्याने २०१९ ची पुनरावृत्ती होणार की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.

महापुराच्या भितीने जिल्ह्यातील शाहूवाडी, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील हजारो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या नद्यााना महापूर परिस्थीती निर्माण झाली होती.

११६ बंधारे पाण्याखाली गेले

११६ बंधारे पाण्याखाली गेले असून, ९ प्रमुख व ३० च्यावर जिल्हा मार्ग बंद झाले आहेत.

संततधार पावसामुळे कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, रात्री उशिरा बावडा-शिये रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे.

उदगाव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पहाटे ४ वाजता पाण्याखाली गेला आहे.

याबरोबरच तालुक्यातील इतर सांगली-कोल्हापूर बायपास मार्गासह जिल्हा व राज्य ८ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त गावात आता साहित्याची बांधाबांध सुरू आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी तालुक्यातील यमगर्णी येथे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे.

सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबली आहे.

दरम्यान मध्यरात्री कोल्हापूर येथून बेळगावकडे जाणारी कार व ट्रक पाण्यातच अडकून पडले.

शिरोळ तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे.

उदगाव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पहाटे ४ वाजता पाण्याखाली गेला आहे.

याबरोबरच तालुक्यातील इतर सांगली-कोल्हापूर बायपास मार्गासह जिल्हा व राज्य ८ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त गावात आता साहित्याची बांधाबांध सुरू आहे.

शिरोली  बायपास रोडवर  पाणी पोलिस सतर्क

शिरोली MIDC पो.ठाणे हद्दीतील पुणे- बेंगलोर NH-4 हायवे लगत असणाऱ्या सांगली फाटा ते कोल्हापूर कडे जाणारा सर्विस रोड व बेंगलोर पुणे कडून शिरोलीकडे जाणारा सर्विस रोड 3-4 फूट रोडवर पाणी असलेने बंद करण्यात आला आहे.

तसेच सांगली फाटा ते सांगलीकडे जाणारा शिरोली जुन्या नाक्याजवळ मार्बल लाईन येथे रोडवर पाणी साचल्याने सदरचा रस्ता बंद असून एकेरी वाहतूक सुरू आहे.

दरम्यान शिरोली पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार पाण्याच्या पातळीकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले.

याठिकाणी बेरीकॅटींग करून बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पेट्रोलिंग सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

हे ही पाहा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT