कळवण (नाशिक); पुढारी वृत्तसेवा: नाशिकमधील कळवण येथील चनकापूर उजव्या कालव्याला काल शुक्रवारी (दि.३) रोजी रात्री मोठे भगदाड पडले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चनकापूर उजव्या कालव्याचे आतील बाजूने सिमेंट काँक्रिटच्या अस्तरीकरणाला मोठी भगदाड पडले आहे. या ठिकाणी त्याच्या शेजारी काटेरी झुडपे व झाडे वाढली आहेत. भगदाड पडल्याने कालव्यातील लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेत पिकांचे नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्याच्या कांदा चाळीत पाणी शिरल्याने कांदाचे नुकसान झाले आहे. याच दरम्यान मका, सोयाबीन, कोबी, तूर आदी एका शेतकऱ्याच्या घरात पाणी शिरले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
भाजीपाला पिकाचे नुकसान तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. पाटबंधारे विभागाकडून कालवा दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंतदेखील यावेळी व्यक्त केली आहे.
हेही वाचलंत का?
पाहा : मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले : पण उंचावले तिने नाव कोल्हापूरचे