पुढारी ऑनलाईन डेस्क: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अन्य दोन नावांची गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून जोरात चर्चा सुरू आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून आगामी निवडणुकांना सामोरे जाताना मोदी आणि शहा ही जोडी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते याकडे लक्ष लागले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांचीही नावे चर्चेत आहेत.
गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपच्या पहिल्या फळीतील नेते असून त्यांची संघटनेवर पकड आहे.
शहा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाटील यांना पक्षसंघटनेची जबाबदारी दिली आहे.
रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पाटील यांच्या नावाची गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून चर्चा आहे. तसेच उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आणखीही काही नावे सुरू आहेत.
जुलै, २०२१ मध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आरोग्यमंत्रीपदाची धुरा दिलेल्या मनसुख मांडविया यांच्या नावाची चर्चा आहे.
मात्र केवळ दोनच महिन्यांत मांडविया यांच्याकडील जबाबदारी बदलतील असे चित्र सध्या तरी नाही.
मांडविया यांनीही गेल्या दोन महिन्यांत आरोग्य खात्यावर पकड मिळविली आहे. लसीकरणाचा वेग वाढविला असून त्याचे रिझल्ट मिळत आहेत.
दुसरे नाव उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे आहे. कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या पटेल यांचे भाजपात वजन आहे. देशात जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच संविधान, लोकशाही जिवंत असेल असे वादग्रस्त विधान त्यांनी मागील महिन्यात केले होते. भाजपचा अजेंडा पुढे नेणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.
चंद्रकात पाटील हे २०१९ मध्ये लोकसभेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले नेते आहेत. २०२२ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाटील यांच्याकडे पक्षसंघटनेची जबाबदारी दिली होती.
मोदी यांचे गुजरातमधील सर्वात विश्वासू खासदार अशी त्यांची दिल्लीत ओळख आहे. इतकेच नाही तर वाराणसी या मोदी यांच्या मतदारसंघावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
सध्या ते खासदारांना देण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत.
पाटील हे मुळचे जळगावचे असून १९८९ पासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत. सूरत येथे स्थायिक असलेले पाटील यांनी तळातून पक्षसंघटनेत काम केले आहे. २००९ पासून ते खासदार आहेत. गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे.
गुजरातमध्ये पुढील वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
मध्यंतरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुजरातमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती.
सरकारी आकडे आणि वस्तुस्थिती यात मोठा फरक होता. त्यामुळे देशपातळीवर गुजरातची मोठी चर्चा झाली होती.
त्याचा मोठा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळेच रुपाणी यांना हटविण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे.
चार वर्षांपूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीआधी आनंदीबेन पटेल यांनाही अशाच पद्धतीने हटवून रुपाणी यांच्याकडे सूत्रे दिली होती.
मागील निवडणुकीत अगदी थोडक्या जागांमुळे काँग्रेसला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. हाच धोका ओळखून आगामी निवडणुकांसाठी खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील वर्षी ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या राज्यांमध्ये भाजपने मुख्यमंत्री बदलाचा सपाटा लावला आहे.
उत्तराखंड येथे दोन वेळा मुख्यमंत्री बदल करण्यात आला. तेथे तीरथ सिंह राव यांना हटवून पुष्कर सिंह धामी यांच्याकडे सूत्रे दिली.
तर कर्नाटकात येडियुरप्पा यांना हटवून बसवरज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले आहे.
हेही वाचा :