Latest

गर्दी वाढणार्‍या ठिकाणी पुन्‍हा लॉकडाउन करा : केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश

नंदू लटके

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन :  गर्दी वाढणार्‍या ठिकाणी पुन्‍हा लॉकडाउन करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने आज दिला. कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढू नये यासाठीच पुन्‍हा लॉकडाउन करावे लागेल, असे पत्र केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्‍यांना पाठवले आहे.

अधिक वाचा 

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्‍याने अनेक राज्‍यांमध्‍ये अनलॉक प्रकिृया सुरु झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. विनामास्‍क फिरणे, सोशल डिस्‍टेंसिग नियमांचे पालन अनेक ठिकाणी होत नसल्‍याचे निदर्शनास येत आहे.

अधिक वाचा 

यामुळे आता गर्दी होणार्‍या शहरांमध्‍ये पुन्‍हा लॉकडाउन करण्‍यात यावे, असे पत्र केंद्रीय गृहसचिव अजय भल्‍ला यांनी राज्‍य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहे.

अधिक वाचा 

पर्यटनस्‍थळांवरील गर्दी चिंताजनक 

भल्‍ला यांनी पत्रात नमूद केले आहे की, ज्‍या भागात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नाही. येथे पुन्‍हा एकदा लॉकडाउन करण्‍यात यावे. या पत्रात पर्यटनस्‍थळांवर होणार्‍या गर्दीवर चिंता व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे.

मागील काही दिवसांमध्‍ये पर्यटन स्‍थळांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

१९ जूनपासून देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. यामुळे टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अनलॉक प्रक्रिया सुरु करावी, असा आदेश केंद्र सरकारने दिला होता.

मागील काही दिवसांमध्‍ये अनेक राज्‍यांमध्‍ये अनलॉक प्रक्रिया सुरु झाली. मात्र कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्‍लंघन होत आहे.

विशेष करुन सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटन स्‍थळांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अद्‍याप कोरोनाची दुसरी लोट पूर्णपणे ओसरलेली नाही.

कोरोना विषाणूचे धोकादायक व्‍हिरिएंटमुळे संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.

सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी हाच चिंतेच विषय असून सध्‍या तरी गर्दी टाळणे हेच महत्‍वाचे आहे, असही केंद्रीय गृह सचिवांच्‍या पत्रात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्‍यासाठी राज्‍यांनी उपाययोजना कराव्‍यात, असेही पत्रात नमूद करण्‍यात आले आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ :आता परदेशी फळं मिळणार मुंबईच्या टेरेसवर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT