संदीप शिरगुप्पे ; पुढारी ऑनलाईन : ऊसाला २० ते ३० डिग्री तापमान, ८०-९०% आर्द्रता, प्रखर सुर्यप्रकाश यासोबत मुबलक पाण्याची आवश्यकता असते. ऊस पीक व्यवस्थापन करताना कडक उन्हाळा, तसेच पाऊस काळातील कमी/नगण्य पाऊसमान यामुळे ऊस पिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.
ऊस पीक व्यवस्थापन करताना ऊसाच्या खोडावर आणि त्यात तयार होणाऱ्या रसावर परिणाम होवून बाष्पीभवनाचा वेग वाढतो व पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो. प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. त्यामुळे या काळात योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात १५ ते ५० टक्के इतकी लक्षणीय घट येते.
ऊस बेणे प्रक्रिया :-
१) रासायनिक बेणे प्रक्रिया
२) जैविक बेणे प्रक्रिया
ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग-किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. सध्या रासायनिक खतांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत, तसेच रासायनिक खते बऱ्याच वेळा वेळेवर उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत उसासाठी ऍसेटोबॅक्टर व स्फुरद विघटक जिवाणूंची प्रक्रिया केल्यास रासायनिक खतात आपल्याला बचत करता येते.
उसामध्येसुद्धा शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. ऊस उत्पादनामध्ये घट येण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यामध्ये शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा अभाव हे प्रमुख कारण आहे.
बहुतेक शेतकरी वर्षानुवर्षे जुने झालेले, अशुद्ध, रोगट, किडके, खोडवा पिकातील ऊस बेणे म्हणून वापरतात. यामुळे उगवण कमी होते. पीक जोमदार नसते आणि असा ऊस रोग-किडींना लवकर बळी पडतो.
म्हणून ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग-किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.
सध्या रासायनिक खतांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत, तसेच रासायनिक खते बऱ्याच वेळा वेळेवर उपलब्ध होत नाहीत.
अशा परिस्थितीत उसासाठी ऍसेटोबॅक्टर व स्फुरद विघटक जिवाणूंची प्रक्रिया केल्यास रासायनिक खतात आपल्याला बचत करता येते आणि काही अंशी खतटंचाईवर मात करता येते.
सध्या आपण ज्या पद्धतीने रासायनिक खते देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र २० ते ३० टक्के, स्फुरद १५ ते २५ टक्के व पालाश ५० ते ५५ टक्के पिकास उपलब्ध होतात. हे लक्षात घेता रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
यामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही.