Latest

आमदार सरोज अहिरे यांचे योगेश घोलप यांना प्रतिआव्हान

backup backup

शिवसेना स्टाईलला राष्ट्रवादी देखील ठोस प्रत्युत्तर देऊ शकते. पण आमच्या नेत्यांनी आम्हाला सुसंस्कृतता शिकवला आहे. धुडगूस घालायला नाही.त्यामुळे आम्ही संयम ठेवतो. पण कोणी अंगावर आले तर शिंगावर घ्यायला देखील तेवढेच तत्पर आहोत. हिंमत असेल तर कार्यक्रमात खो घालून बघाच. राष्ट्रवादीने काही बांगड्या भरलेल्या नाहीत, असे जाहीर आव्हान आमदार सरोज अहिरे यांनी माजी आमदार योगेश घोलप यांना पत्रकार परिषदेत दिले.

देवळाली येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी ( ता.८ ) पत्रकात परिषद झाली. त्यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी माजी आमदार योगेश घोलप यांच्या आरोपांना उत्तर देताना आपली भूमिका मांडली. आमदार सरोज अहिरे यांनी यावेळी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुकटचे श्रेय लाटणारी नाही. मतदार संघात विकासकामांचा धडाका सुरू आहे. माजी आमदार योगेश घोलप यांना ते सहन होत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. त्यामुळे ते असे बिनबुडाचे आरोप करीत आहे. महाविकास आघाडीचा धर्म राष्ट्रवादी प्रामाणिकपणे पाळत आहे. माजी आमदार योगेश घोलप यांनी देखील तो पाळायला हवा. त्यांच्या कार्यकाळात कामे मंजूर झाली, असा त्यांचा दावा आहे. तर माग कामाची वर्क ऑर्डर का निघाली नाही. उगाच चुकीचे कागदपत्रे दाखवत जनतेची दिशाभूल करु नये. जनतेला सर्वकाही समजते. याचे भान माजी आमदार घोलप यांनी ठेवायला हवे.
'घरी बसून अभ्यास करा'

माजी आमदार योगेश घोलप यांना जनतेने घरी का बसविले. त्याचा विचार त्यांनीच करायचा हवा.३० वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. मंत्रिपद होते. मग मतदार संघ ऐवढा भकास कसा ? इतर आजी-माजी मत्र्यांचे मतदार संघ बघा कसे विकसित दिसतो. माजी आमदार योगेश घोलप यांना जनतेने सद्या घरी बसविले आहे. त्यांनी त्याचा विचार करावा, योग्य, अयोग्य काय ? हे ठरविण्यासाठी मतदारांनी त्यांना भरपूर वेळ दिलेला आहे. त्याचा सदुपयोग त्यांनी करावा, असे आमदार अहिरे यांनी म्हटले.

खासदार-आमदार यांच्यात लढाई नको

खासदार हेमंत गोडसे हे संयमी, शांत नेते आहे. त्यांच्या विषयी माझ्या मनात कोणताही किंतु परंतु नाही. त्यांना माझा विरोध नाही. उलट पाठींबाच आहे. माजी आमदार घोलप यांनी उगाच खासदार गोडसे आणि माझ्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये. त्याने काहीएक साध्य होणार नसल्याचे अहिरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

त्रास देणे थांबवायला हवे

नगरसेवक झाल्यापासून घोलप कुटुंब मला त्रास देत आहे. आता तर जनतेने मला आमदार केले आहे. त्यामुळे त्यांच्या त्रासात अधिक भर पडली आहे. पण मी खंबीरपणे उभी राहिले आहे. त्यांना जी भाषा समजते. त्याच भाषेत उत्तर देईल, असे आमदार अहिरे यांनी सांगितले.

हेही वाचा: 

SCROLL FOR NEXT