पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यातील युद्ध अंतिम टप्प्यात आले असून अफगाणिस्तानमधील सरकारचापाडाव होण्याची चिन्हे आहेत. तालिबानी सैन्य काबूलच्या सीमेवर आले असून तालिबानने एक पत्र जाहीर केले आहे.
१४ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील जलालाबाद शहरावर कब्जा मिळविला.
यावेळी त्यांना कुठलाही विरोध झाला नाही. जलालाबाद आणि काबूल या दोन शहरांतील अंतर काही तासांचे आहे.
तालिबानने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, 'तालिबानने काबुलमध्ये अद्याप प्रवेश केला नाहीय.
आमचे लढाऊ सैनिक शहराच्या बाहेरील भागात आहेत. सध्या ते शहरात जाणार नाहीत.
सध्या अफगाणिस्तान तालिबान यांच्यात सत्ता आणि सुरक्षा हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू आहे.'
काबूलमध्ये दाट लोकवस्ती आहे. आम्ही नागरी वस्तीत हल्ला करणार नाही. सामान्य लोकांनी बाहेर पडू नये, असे सांगत तालिबानी सैन्यांना अद्याप काबूलबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत.
तालिबानने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, अफगाणांनी देशात रहावे. आम्ही शांततापूर्ण मार्गाने देशातील सत्ता हस्तांतरणासाठी प्रयत्न करत आहोत.
सर्व स्तरातील लोकांनी, भविष्यातील इस्लामी व्यवस्थेत स्वत:ला जबाबदार सरकारसह जी सेवा करते आणि सर्वमान्य असेल.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी, अमेरिकेचे राजदूत झालमे खालिलजाद आणि 'नाटो'च्या अन्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविण्यात आली.
एकीकडे अश्रफ घनी यांनी आपले सैन्यबळ वाढव असल्याचे सांगितले मात्र, तालिबानी हल्लेखोर काबूलमध्ये शिरले, तेव्हा त्यांना फारसा विरोध झाला नाही.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी ट्विटर हँडलवर नुकताच एक संदेश जाहीर केला आहे.
यात त्यांनी नागरिकांना राजधानीतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
'काबूलमध्ये गोळीबाराच्या तुरळक घटना घडल्या आहेत. पण काबूलवर हल्ला झालेला नाही.
शहर सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा दल आणि लष्कर आंतरराष्ट्रीय मित्रराष्ट्रांसोबत एकत्र काम करत आहेत आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे,' असा मेसेजे दिला आहे.
याआधी, अफगाणिस्तानात आता राजधानी काबूल वगळता बाकीच्या सर्व महत्त्वाच्या शहरांवर तालिबानने ताबा मिळवला आहे.
आतापर्यंत सरकारच्या नियंत्रणात असलेलं मजार-ए-शरीफ हे उत्तर अफगाणिस्तानातलं मोठं शहर आता तालिबानच्या ताब्यात गेले आहे.
तालिबानला विरोध करणारे उझबेक सेनानी अब्दुल रशीद दोस्तूम आणि ताजिक नेता अट्टा मोहम्मद नूर यांनी या प्रांतातून पलायन केले.
त्यांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतल्याचे समजते.
शनिवारी तालिबानी सैन्यांनी अफगाणिस्तानच्या पुर्वेकडील जलालाबाद या शहरावर कब्जा मिळविला. अफगाण सैन्यांनी कोणताही विरोध न करता शहर ताब्यात दिले. रविवारी जलालाबादमधील एका अफगाण अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग होता.'
अफगाणिस्तान-पाकिस्तान रस्ता जलालाबाद शहरातून जातो. तालिबानने अफगाणिस्तानातील ३४ पैकी २३ प्रदेशांच्या राजधान्यांवर नियंत्रण मिळवले आहे. बाल्ख प्रांताची राजधानी आणि अफगाणिस्तानातील चौथे मोठे शहर असलेल्या मजार-ए-शरिफवरही तालिबानने सहज कब्जा मिळविला.
तालिबान्यांसमोर अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय लष्कराने सर्वप्रथम आत्मसमर्पण केले. त्यानंतर सरकार समर्थक सैन्य आणि नागरी सैन्यानेही पराभव मान्य केला.
तालिबानने हल्ला सुरू केल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी आपापल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे काबूल विमानतळावरही शनिवारी मोठी गर्दी उसळली होती. अमेरिकेनं नागरिकांची सुटका करण्यासाठी पाच हजार सैनिक पाठविले आहेत. शहरातील अनेक बॅकांमध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या असून पैसे संपत आले आहेत.
हेही वाचलं का ?