Latest

अखेर किम शर्मा- लिएंडर पेस रिलेशनशिपमध्ये

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) आणि टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) हे दोघेजण गोव्यात रोमान्स करताना दिसल्यावर त्याच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. पंरतु, यानंतर दोघांनी ही याबाबतचा कोणताही खुलासा केलेला नव्हता. आता मात्र, किम शर्माच्या एका फोटोमुळे या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

किम शर्माने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत किम शर्मा आणि बॉयफ्रेंड लिएंडर पेस एकमेकांसोबत असल्याचे दिसत आहे.

या फोटोत किमने पांढऱ्या रंगाचा ड्रेस, तर लिएंडर पेसने ब्लू टीशर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहे. दोघेही कपलसारखे एकमेकांशेजारी उभारले आहेत. याशिवाय लिएंडर प्रेमाने किमकडे टक लागून पाहात आहे. तर किमने कॅमेऱ्यात पाहून पोझ दिली आहे.

या फोटोला किमने कोणतेही कॅप्शन दिली नाही. परंतु खास करून, यात एक मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेम दर्शविणाऱ्या इमोजीचा वापर केला आहे. यामुळे किम आणि लिएंडर पेस दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दिसून येत आहे.

 डेट करत असल्याचे कन्फर्म

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर दोघेजण एकमेकांंना डेट करत असल्याचे कन्फर्म झाले आहे. यामुळे आता त्याच्याबद्दलच्या पसरणाऱ्या अफवांना देखील पुर्णविराम मिळाला आहे.

याआधी किम आणि लिएंडर दोघेजण गोव्यात सुट्ट्याचा आनंद घेताना स्पॉट झाले होते. यावेळचे काही फोटो किमने सोशल मीडियावर शेअर करताच दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. याशिवाय दोघांना मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये देखील पाहिले गेले होते.

किमने याआधी युवराज सिंग, केनियाचा व्यापारी अली पणजनी आणि फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन अर्जुन खन्ना यांना डेट केले होते. केनियाचा व्यापारी अली पणजनीशी लग्न केलं होतं. परंतु, ते फार काळ टिकले नाही.

किम शर्माने 'मोहब्बतें','तुम से अच्छा कौन है','जिंदगी रॉक्स','मनी है तो हनी है' अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. परंतु तिला यश मिळाले नाही.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT