Latest

वाशीममध्ये युवकाचा निर्घृण खून; १२ तासात आरोपी जेरबंद

अमृता चौगुले

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : वाशीम शहरात सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास २३ वर्षांच्या युवकाचा धार-धार शस्त्राने गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला. ही घटना पंचशील नगर शिवार येथे घडली. खून झालेल्या युवकाचे नाव आकाश अरुण कोठेकर (ध्रुव चौक,वाशीम) असे आहे. मात्र या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी गतिमान सुत्रे हालवत खुनातील मुख्य आरोपीस दोन तासात तर दुसऱ्या आरोपीस १२ तासात जेरबंद करण्यात यश मिळवले.

शहरात सोमवारी रात्री आकाश कोठेकर याचा खून करण्यात आला. आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर एक मोठं आवाहन सुद्धा उभे होते. दरम्यान सायबर सेलच्या मदतीने शहर पोलिसांकडून आरोपीचा मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्याची शोध मोहीम राबवण्यात आली. अखेर दोन तासाच्या आत अथक परिश्रमानंतर खुनातील मुख्य आरोपी आकाश जिरवणकर याला पोलिसांनी जेरबंद केले. तर दुसरा आरोपी पवन चिंतामण जोरावार (वय १९, रा. हिंगोली) याला मंगळवारी ९ मे रोजी पकडण्यात वाशीम पोलिसांना यश आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शेख रफीक, लालमणी श्रीवास्तव, रामकृष्ण नागरे, ज्ञानदेव मात्रे, विठ्ठल महल्ले, अनिल बोरकर, संदीप वाकुडकर सायबर सेलचे दिपक घुगे यानी उत्कृष्ट कामगिरी करीत आरोपीला जेरबंद केले.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT