Latest

Death During Watching Avatar-2 : आंध्र प्रदेशमध्‍ये ‘अवतार-२’ पाहत असताना तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात सध्या हार्ट अटॅकने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. काही वेळा एखाद्या कार्यक्रमामध्ये, काही व्यायाम करत असताना अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत. सध्या मात्र एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. आंध्र प्रदेश मध्ये एका तरुणाचा थिएटरमध्ये चित्रपट पाहत असताना मृत्यू झाला आहे. अवतार भाग २ चित्रपट पाहत असताना झालेल्या मृत्यूमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलेले आहे. (Death During Watching Avatar-2)

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, लक्ष्मीरेड्डी श्रीनू हे आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यातील पेद्दामपुरम शहरातील रहिवासी होते. ते अवतार भाग २ (Avatar: The Way of Water) चित्रपट पाहण्यासाठी श्री ललिता थिएटरमध्ये गेले.  लक्ष्मीरेड्डी यांना अचानकपणे अस्वस्थ वाटू लागले. चित्रपट सुरु असतानाच ते खुर्चीवरुन खाली पडले. बंधू राजू  त्यांच्या मदतीसाठी धावले. त्‍यांना तत्‍काळ पेद्दापुरमच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराचा झटका आल्याने लक्ष्मीरेड्डी श्रीनू  मृत्यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. . (Death During Watching Avatar-2)

राजू यांनी आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी दिल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला.  लक्ष्मीरेड्डी श्रीनू यांच्या पश्चात दोन मुले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT