Latest

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या याचिकेवर दिल्ली न्‍यायालयाने पोलिसांकडून मागवला अहवाल; १२ मे राेजी हाेणार सुनावणी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध कुस्तीपटूंचे दिल्लीतील जंतरमंतरवर (Wrestlers Protest) आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत बृजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्‍याची मागणी कुस्तीपट्टूंनी केली आहे. दरम्यान, याची दखल घेत दिल्ली न्‍यायालयाने पोलिसांकडे अहवाल मागवला आहे. याप्रकरणी १२ मे रोजी सुनावणी घेण्यात येईल, असेही न्‍यायालयाने स्पष्ट केले आहे.

'डब्ल्यूएफआय'चे (Wrestlers Protest) अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरुद्धच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी कुस्तीपटूंनी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्‍यायालयाने दिल्ली पोलिसांकडे याप्रकरणाचा स्थिती अहवाल मागवला आहे. यानंतर हे प्रकरण १२ मे रोजी सुनावणीसाठी घेण्यात येणार असल्याचे न्‍यायालयाने  स्पष्ट केले आहे.

ऑलिम्पिक व राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध पदके जिंकणार्‍या महिला मल्लांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.  देशाच्या कानाकोपर्‍यातील 200 हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्‍तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला; पण तो जाहीर करण्‍यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT