IndiGo Flight : इंडिगो विमानाच्या केबिनमध्ये आला जळलेला वास, खबरदारी म्हणून केली इमर्जन्सी लँडिंग | पुढारी

IndiGo Flight : इंडिगो विमानाच्या केबिनमध्ये आला जळलेला वास, खबरदारी म्हणून केली इमर्जन्सी लँडिंग

पुढारी ऑनलाईन: तमिळनाडूतील तिरूचिरापल्ली ते सिंगापूर दरम्यान प्रवास करणारे IndiGo चे A320ceo 6E-1007 हे विमान आज सकाळी (दि.१०) अचानक लॅन्ड करण्यात आले. इंडोनेशियाच्या कुआलानामू विमानतळावर इंडिगो कंपनीचे विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. क्रूला विमानाच्या केबिनमध्ये जळालेला वास येताच वैमानिकाने सुरक्षेच्या कारणास्तव, नियमांचे पालन करत विमान सुरक्षितपणे उतरवले असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

भारतातून सिंगापूरला जाणाऱ्या या विमानाची (IndiGo Flight) उड्डाणापूर्वी तपासणी केली असता ते सुस्थितीत होते. परंतु अचानक वैमानिक आणि क्रूला केबिनमध्ये जळलेला वास आला. यानुसार सावधतेची दखल घेत आणि नियमांचे पालन करत खबरदारी म्हणून वैमानिकाने हे विमान जवळच्या कुआलानामू विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. या घटनेनंतर प्रवाशांना सिंगापूरला नेण्यासाठी पर्यायी विमानाची सोय करत, क्वालानामूलहून सिंगापूरला पाठवले जात आहे.

हेही वाचा:

Back to top button