Patra Chawl land scam case | पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण- संजय राऊत न्यायालयात हजर

मुंबई, पुढारी ऑनलाईन : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज सत्र न्यायालयात हजर झाले. याप्रकरणी आज आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे. (Patra Chawl land scam case) ३१ जुलै २०२२ रोजी तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.
(Patra Chawl land scam case)
#WATCH | Mumbai: Uddhav Thackeray faction MP Sanjay Raut arrives at Sessions Court in connection with Patra Chawl land scam case. Framing of charges in the matter likely to take place today. pic.twitter.com/jpIOiKwxyI
— ANI (@ANI) May 10, 2023
घटनाक्रम
27 डिसेंबर 2021 : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’कडून पहिले समन्स.
4 जानेवारी 2022 : वर्षा राऊत यांची ‘ईडी’कडून साडेतीन तास चौकशी.
11 जानेवारी : वर्षा राऊत यांना ‘ईडी’कडून दुसर्यांदा समन्स.
2 फेब्रुवारी : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक.
5 एप्रिल : ‘ईडी’कडून संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त.
27 जून : संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ‘ईडी’कडून समन्स.
28 जून : संजय राऊत यांनी वकिलांमार्फत पत्र पाठवत ‘ईडी’कडे चौकशीला हजर राहण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत वेळ मागितली.
1 जुलै : ‘ईडी’च्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी गेलेल्या संजय राऊत यांची दहा तास चौकशी.
27 जुलै : संजय राऊत यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स. राऊत चौकशीला गैरहजर.
31 जुलै : सकाळी सात वाजताच ‘ईडी’चे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडुपमधील घरी दाखल. तब्बल नऊ तासांच्या झाडाझडती आणि चौकशीनंतर दुपारी चार वाजता संजय राऊत ‘ईडी’च्या ताब्यात. रात्री उशिरा अटक.
1 ऑगस्ट : संजय राऊत यांना 8 दिवसांची पोलिस कोठडी.
4 ऑगस्ट : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’चे समन्स.
6 ऑगस्ट : वर्षा राऊत यांची ‘ईडी’कडून नऊ तास कसून चौकशी.
8 ऑगस्ट : संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. आर्थर रोड कारागृहात रवानगी.
22 ऑगस्ट : 14 दिवसांनी संजय राऊत यांच्या कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ.
5 सप्टेंबर : न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ.
7 सप्टेंबर : जामिनासाठी अर्ज दाखल.
8 सप्टेंबर : जामीन अर्जावरील सुनावणी सुरू.
14 सप्टेंबर : ‘ईडी’कडून संजय राऊत यांच्या जामिनाला जोरदार विरोध; सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर.
19 सप्टेंबर : संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ.
27 सप्टेंबर : सुनावणीवरील कारवाई पूर्ण होऊ न शकल्याने न्यायालयाने सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली.
3 ऑक्टोबर : संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ.
10 ऑक्टोबर : जामीन अर्जावरील सुनावणी 17 ऑक्टोबरपर्यंत पुढे.
21 ऑक्टोबर : ‘ईडी’च्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तिवाद करायचा आहे, असे न्यायालयाला सांगितले. सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत स्थगित.
2 नोव्हेंबर : राऊत यांच्या जामिनासंदर्भात ‘ईडी’ने लेखी उत्तर सादर केले. मात्र, जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला.
9 नोव्हेंबर : संजय राऊत यांना अखेर 102 दिवस कोठडीत काढल्यानंतर जामीन मंजूर.