Latest

Camel Flu : कतारमध्ये ‘कॅमल फ्लू’चा संसर्गचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोविड महामारीनंतर कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेसाठी जगभरातून सुमारे 1.2 दशलक्ष प्रेक्षक कतारमध्ये आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कतारमध्ये आलेल्या फुटबॉल चाहत्यांना 'कॅमल फ्लू'चा (Camel Flu) संसर्ग होण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिला आहे. मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) हा कॅमल फ्लू म्हणून ओळखला जातो. हा संसर्ग कोविडपेक्षा घातक असू शकतो. 2012 मध्ये सौदी अरेबियामध्ये हा संसर्ग पहिल्यांदा आढळून आला होता.

ताप, खोकला आणि धाप लागणे ही एमईआरएसची (MERS) लक्षणे आहेत. हा आजार रुग्णांना नेहमीच होत नाही. एमईआरएस रुग्णांमध्ये अतिसार आणि इतर गॅस्ट्रो इंटेस्टाइनल लक्षणे देखील दिसून येऊ शकतात. या रोगाचा मृत्यू दर 35 टक्के इतका आहे.
कॅमल फ्लूचा (Camel Flu) विषाणू झुनोटिक आहे. तो मानव आणि प्राण्यांमध्ये पसरू शकतो. अभ्यासानुसार, संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क झाल्यास याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी कतारमध्ये येणाऱ्या प्रवाशांना उंटांना हात न लावण्याची चेतावणी देण्यात आली आहे. कतारमधील पर्यटन व्यवसायात अजूनही उंट सवारीचा वापर केला जातो. त्यामुळे संसर्गाची शक्यता अधिक आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात फुटबॉल चाहत्यांनी कतारमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे खेळाडू, चाहते, स्थानिक आणि संघाचे मूळ देशात संभाव्य संसर्गजन्य रोगाचा मोठा धोका संभवतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, या संसर्गाबाबत उपाययोजना राबविण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप सूचना दिलेल्या नाहीत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT