FIFA WC Ceremony 2022 : कतारमध्ये फुटबॉलच्या विश्वयुध्दाला प्रारंभ

FIFA WC Ceremony 2022
FIFA WC Ceremony 2022
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक (FIFA WC Ceremony 2022) स्पर्धेला आज (दि.२०) कतारमध्‍ये रंगारंग कार्यक्रमाने प्रारंभ झाला. प्रथमच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आखाती देशामध्ये होत आहे. या स्पर्धेत जगभरातील एकूण ३२ देश सहभागी होणार आहेत.

पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर याच्यात आज (दि.२०) रात्री ९.३० वाजता (भारतीय वेळेनुसार) दोहा येथील अल बायत स्टेडियमवर (FIFA WC Ceremony 2022) खेळवण्यात येणार आहे. आज यजमान कतार आणि इक्वाडोर यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी स्पर्धेचा उद्धघाटन सोहळा अल बायत स्टेडियमवर पार पडला. हा उद्धाटन सोहळा भारतीय वेळेनुसार ७.३० ला पार पडला.

 भारताच्या उपराष्ट्रपतींची उपस्थित

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपाक्ष्यक्ष जगदीप धनकड यांनी उपस्थिती लावली. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कतारचे अमीर शेख तमीम बेन हमाद अल थानी यांनी दिलेल्या निमंत्रणावरून धनकड २०-२१ नोव्हेंबर रोजी कतारमध्ये उपस्थित राहिले आहेत. फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त ते उपराष्ट्रपती यांच्या भेटीदरम्यान, भारतीय समुदायाच्या सदस्यांनादेखील भेट दिली.

उद्घाटन सोहळ्यासाठी जगभरातील कलाकारांना निमंत्रण

कतारमधील अल बायत स्टेडियमवर विश्वचषक स्रर्धेच्या उद्घाटन समारंभाची सुरूवात सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. यामध्ये स्थानिक कलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण केले. त्यांनतर बीटीएस बँडचा गायक जंगकूकने स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचवले.

यावेळी गायक जंग कूकने त्याच्या नवीन ट्रॅक 'ड्रीमर्स' गाण्याने उद्घाटन समारंभात चार चाँद लावले. तर हॉलिवूड स्टार मॉर्गन फ्रीमनने फिफा विश्वचषक २०२२ च्या उद्घाटन समारंभात आशा, एकता आणि सहिष्णुतेचा संदेश दिला. तत्पूर्वी, फ्रान्सचा दिग्गज खेळाडू मार्सेल डिसाईलीने चाहत्यांसमोर विश्वचषक ट्रॉफी सादर केली. यानंतर कतारचे शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी अधिकृतपणे विश्वचषकाच्या उद्घाटनाची घोषणा केली. त्यांनी सर्वांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या भाषणाने उद्घाटन समारंभाची सांगता झाली.

विश्नविजेत्या संघाला मिळणार २६ पट अधिक बक्षीस

क्रिकेट आणि फुटबॉल विश्नचषक जिंकणाऱ्या संघांना किती रक्कम मिळते. हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. महत्वाची बाब म्हणजे दोन्ही विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत जवळपास २६ पट फरक आहे. फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाला मिळणारी रक्कम ही टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघापेक्षा २६पट अधिक आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण ४५.१४ कोटी रूपयांची बक्षीस जाहीर केली होती. ती सर्व १६ संघांमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने वाटली होती. अंतिम फेरीतील विजेत्या संघाला सुमारे १३ कोटी रूपयांची रक्कम देण्यात आली होती. तर स्पर्धेतील उप-विजेत्या संघाला सुमारे ६.४४ कोटी रुपये इतकी रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली होती. फिफा विश्वचषक स्पर्धेत मात्र, बक्षीस म्हणून तब्बल ३,५८५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news